लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. त्या मानाने वृक्षांची लागवड व संगोपनाकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.पूर्व विदर्भातील एकटा भंडारा जिल्ह्यात तीन राज्यमार्गांचा दर्जा वाढवून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. यात रामटेक-गोंदिया, भंडारा आरोली मार्गे रामटेके आणि भंडारा ते पवनी या राज्यमार्गांचा समावेश आहे. जवळपास २१० किलोमिटर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी जुनी व मोठी वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली. विशेषत: रामटेक ते भंडारा व भंडारा ते पवनी शहराला लागून असलेल्या निलज फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील वृक्ष संपदेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. विशेष म्हणजे काही पर्यावरण पे्रमींनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर भंडारा पवनी राज्यमार्गावरील काही ठिकाणची मोठी व जुनी झाडे कापण्यात येणार नाही, अशी भुमिका घेण्यात आली. मात्र अन्य मार्गांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. असाच प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील लाखनी ते किटाडी मार्गे जोडणाºया अड्याळपर्यंतच्या मार्गावरही येत आहे. या शिवाय करडी-पालोरा ते पालांदूर मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याप्रमाणात मात्र रोपांची लागवड व संगोपनाबाबत बांधकाम करणाºया कंपन्यांचे धोरण उदासिनपणाचे आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याने जमीनीची धुप वाढून त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होईल असी भीतीही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पूर्व विदर्भातील जवळपास पाच रस्त्यांचे विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. त्यापैकी तीन रस्त्यांना महामार्गाचा दर्जा दिल्या नंतर त्या मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली आहे. यावर वेळीच दखल घेवून पावसाळ्यात या मार्गांवर रोपांची लागवड व संगोपन करणे नितांत गरजेचे आहे.मो. सईद शेखपर्यावरण अभ्यासक, भंडारा