देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले.सोमवारला सकाळी ७ पासून मतदानाला प्रारंभ करण्यात आला. उष्णतेचा धसका घेत अनेक मतदार सकाळी किंवा सायंकाळच्या सुमरास मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. सकाळी ९ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ५.९८ एवढी होती. त्यामुळे मतदारांनी उन्हाची दाहकता कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी गेले. प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार वृत्तपत्रांमध्ये मतदानाची वेळ सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी ५.३० वाजतापासून मतदारांची गर्दी दिसून आली. सायंकाळी ६ वाजता मतदानाची प्रक्रिया बंद करण्यात आली. ६ च्या पूर्वीच बहुतांश मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी गर्दी केली असता मतदानाची वेळ संपल्याची सांगून मतदारांना परत पाठविण्यात आले.शहरातील संत शिवराम महाराज विद्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेट दिली असता अनेक मतदार प्रवेशद्वारासमोर उभे होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांची पोलिसांशी हुज्जत सुरु होती. त्यांनी हा प्रकार ‘लोकमत’ला सांगितला. त्यानंतर सदर प्रतिनिधीने मतदान केंद्र गाठले असता त्यांना त्यांना मतदान केंद्राबाहेर गर्दी दिसली. उपस्थित कर्मचाºयांना सांगूनही त्याचा काहीएक फायदा झाला नाही.त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त मतदारांनी परत जाण्याचे ठरविले. दरम्यान, तहसीलदार संजय पवार मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानापासून वंचित असलेल्या मतदारांनी सदर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. मात्र त्यांना देखील वेळेसंबंधी संभ्रम असल्यामुळे मतदान केंद्रातील अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर कळवितो, असे सांगून ते मतदान केंद्रात गेले. तिथे अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली असून मशिन सिलबंद करण्यात आले आहे. मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजतापर्यंतच आहे, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा तहसीलदारांनी उपस्थित मतदारांना सांगितली. त्यामुळे निराश झालेल्या मतदारांनी मतदान न करताच घरची वाट धरली.
वेळेच्या संभ्रमामुळे शेकडो मतदार मुकले मतदानाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:39 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले.
ठळक मुद्देघोळच घोळ : चूक कुणाची अधिकाऱ्यांची की मतदारांची