शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:11 AM

उठा रे बाळानों सकाळ झाली. झोपू देनं ग आई, आई चाय झाला का. भूख लागली जेवायला दे, असा आईशी होणारा दररोजचा संवाद व हाक देणारी शिवलालची दोन पोर रुग्णालयात उपचार घेत आहेत. हक्कासाठी लढणाऱ्या या पोरांच बालपण प्रशासनात हिरावून घेतलं आहे.

ठळक मुद्देसिरसोली येथील प्रकरण । उद्ध्वस्त घराने त्यांचे बालपण हिरावले?

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उठा रे बाळानों सकाळ झाली. झोपू देनं ग आई, आई चाय झाला का. भूख लागली जेवायला दे, असा आईशी होणारा दररोजचा संवाद व हाक देणारी शिवलालची दोन पोर रुग्णालयात उपचार घेत आहेत. हक्कासाठी लढणाऱ्या या पोरांच बालपण प्रशासनात हिरावून घेतलं आहे.बालपण म्हणजे मस्ती, मजा, ना काळजी, ना चिंता, बिनधास्त असं वावरण पण, मानवी प्रकोपाने मौजमजेचे दिवस जाणीवपूर्वक हिरावले जातात. तेव्हा सगळं बालपण आपूसकच बाजूला सारलं जात असते. अगदी असचं घडलं सिरसोली येथील शिवपाल लिल्हारे यांच्या दोन पोरांसोबत. महसूल प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायतने शिवलालचं लिल्हारेचा घर उध्वस्त केला. या घटनेमुळे शिवलालचे कुटुंब बेघर झाले. एका क्षणात संसार उघड्यावर आणले गेले. शिवलाल आता खचून गेला आहे, पण अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी शिवलालची समीर व सतीश ही अल्पवयीन मुले पुढे आली. आधी तीन दिवस उपोषण त्यांनी केलं. पदरात काही पडल नाही. पून्हा ही दोघे भावंडे १३ जून रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणावर बसली. बालपण, हुदंडण्याच, खेळण्याच मौज मस्ती असं भरलेलं असतं. पण मागील पंधरवाड्यापासून या दोघा मुलांचे बालपण निर्दयी प्रशासनाने हिरावून घेतले आहे.दोन तीन वेळा जेवण करणारी ही लहान बालके दोन दिवस उपाशी होती. त्यांना शुक्रवारच्या सायंकाळी अस्वस्थ वाटू लागले. समीर व सतीशला मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आल आहे. रानात फिरणाºया बालकांना रुग्णालयाच्या खाटेवर जाण्याची वेळ प्रशासनात आणली आहे. सतीश हा नववीला गेला तर समीर शालांत परीक्षा उत्तीर्ण होवून अकरावीत जाणार आहे. या दोघांच सगळे कागदपत्र उध्वस्त घराच्या मलब्यात दबली आहेत, की कुठे याचा थांगपत्ता त्यांना नाही.त्या दोन भावंडासमोर एकच प्रश्न उभा झाला आहे तो हक्काच्या निवाºयाचा. आमच हक्काच घर कधी उभं राहिल या न्यायासाठी आज ही दोन पोर शांततेच्या मार्गाने उपोषण करुन लढत आहेत. अतिक्रमणाच्या नावाने घर पाडल गेलं. पण, सिरसोलीत एकाच परिवाराचे अतिक्रमण अडचणीचे होते काय हा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रशासनाने नियमानुसार घर पाडले हे खरे असलेही पण, घर पाडणे हा पर्याय नव्हताच, अनेक मार्ग काढता आले असते.गावचा राजकारण, सत्तेची धुंदीने शिवलालच्या घरावर जेसीबीचा पंजा चालवला गेला. या पंज्याने पूर्ण परिवार दु:खी झाला आहे.प्रशासनाने मानवीय हित बघितले नाही. कोणाच्या तरी इशाºयावरुन स्थानीक प्रशासनाला साथ दिली. द्वेष व दहशतीचा राजकारणाने सिरसोली गाव दुभंगला गेला आहे.गावात शांत वादळ निर्माण होतोय इथे आता शिवलाल बाजूला सारला गेला काय अशी परिस्थिती दिसू लागली आहे. दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये शक्ती परीक्षा चालली आहे. पण, या वादात भरडले जात आहेत शिवलालचे कुटुंब, त्यापेक्षा अधिक चिंताग्रस्त झाली आहेत ती दोन मुलं. आमच पुर्वीसारख सुखरुप होईल या आशाळभूत नजरेन ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपुढे बघत असतात. तर कधी नेत्यांकडे पण, कठोर काळजाच्या प्रशासनाने मानवी मन मृत केलयं. त्यामुळे आता, पुढच्या आशेचा किरण कधी उजाडतोय याची प्रतीक्षा समीर व सतीश ही लहान पोर न्याय हक्कातून करीत आहेत.

टॅग्स :Strikeसंप