शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पती गेले, आता कर्ज कसे फेडायचे!

By admin | Published: August 05, 2016 12:40 AM

तालुक्यातील सातलवाडा येथील हौसीलाल बिसेन (५३) या शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापीकीला कंटाळून राहत्या घरीच ...

कुटुंबीयांसमोर पेच : प्रकरण सातलवाडा येथील शेतकरी आत्महत्येचे संजय साठवणे साकोली तालुक्यातील सातलवाडा येथील हौसीलाल बिसेन (५३) या शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापीकीला कंटाळून राहत्या घरीच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या शेतकऱ्यावर सोसायटी व इतर बँकाचे मिळून दोन लाखापेक्षा अधिक कर्ज आहे. पतीने आत्महत्या केली. आता कर्जाची परतफेड करायची तरी कशी असा प्रश्न मृतकाची पत्नी शारदाबाई व मुलांसमोर आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोपचे कुटुंबियाची भेट देवून त्यांचे सांत्वन केले. बिसेन कुटुंबियाकडे पाच एकर जमीन आहे. या शेतीच्या भरोश्यावर पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांचा उदरनिर्वाह करायचा. चारपाच वर्षापुर्वी हौसीलालने दोन्ही मुलांचा व मुलीचा विवाह केला. मात्र शेतीला सिंचनाची सोय नसल्यामुळे दोन वर्षापुर्वी महाराष्ट्र बँकेतून कर्ज काढून बोरवेल खोदली. सततची नापीकी व वाढते कर्जाचे डोंगर याला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी हौसीलालने आत्महत्या करीत असल्याबाबत चिठ्ठी लिहून ठेवली होती. घटनेचा दुसरा दिवस असून महसुल प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने मृत शेतकऱ्याच्या कुटूंबियांची भेट घेतली नाही. मदत द्या -राकाँची मागणी मृतक हौसीलाल बिसेन यांची परिस्थिती हलाखीची होती. शेतीसाठी त्यांनी दोन लक्ष रूपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करू न शकल्याने आत्महत्या केली. त्यामुळे हौशीलालचे कर्ज माफ करून पाच लाखांची मदत करावी, अशी मागणी राकाँचे प्रदेशसचिव अविनाश ब्राम्हणकर, माजी सभापती मदन रामटेके यांनी केली आहे. यावेळी नरेंद्र वाडीभस्मे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश कापगते, हेमंत भारद्वाज, सरपंच रामकृष्ण कोही, ग्रामसेवक विनोद भेंडारकर, सेवा सहकारीचे अध्यक्ष शैलेश गजभिये यासह अन्य उपस्थित होते. भजन करून केली आत्महत्या हौसीलाल हा मनमिळावू वृत्तीचा होता. गावात कोणतेही कार्यक्रम असो त्यात हौसीलालची हजेरी असायचीच. हौसीलाल हा भजन म्हणायचा. घटनेच्या आदल्या दिवशी श्रावण महिन्याची सुरवात व जिवतीचा सण होता. त्यामुळे गावातील हनुमान मंदिरात रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यात हौसीलालनेही भजन म्हटले. कर्जाची चिंता होतीच त्यामुळे घरी जाऊन त्याने किटकनासक प्राशन करून जीवनज्योत संपविली. परिस्थिती हलाखीची बोपचे कुटुुंबियांची परिस्थिती हलाखीची आहे. शेतीवर उदरनिर्वाह होत नसल्यामुळे शेतीचा हंगाम झाला की हौसीलालची दोन्ही मुले ही शहरात कामासाठी जात होती. त्यामुळे घटनेच्यावेळी हौसीलालचा लहान मुलगा प्रमोद हा हजर होता तर मोठा मुलगा पवन हा दोन महिन्यापुर्वी कर्नाटक येथे मजुरीसाठी गेला.वडिलांच्या मृत्युची बातमी मिळाली असली तरी प्रवास लांबचा असल्यामुळे तो उद्या ५ ला सायंकाळपर्यंत पोहचणार आहे. तालुक्यातील गावात एका शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली. घटनेची माहिती सर्वांनाच मिळाली मात्र साकोलीच्या तहसलिदारांनाही बोपचे कुटुुंबियांना साधी भेट घेण्याचीही वेळ मिळाली नाही.