लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ येथील मुख्य जलवितरण वाहिका जीर्ण झाल्यामुळे पेयजल राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनंतर्गत ६७ लाख रूपयांची नवीन मुख्य जलवितरण वाहिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. गत सहा महिन्यांपासून बांधकामाला सुरूवात झाली असली तरी यामध्ये अनेकदा व्यत्यय येवून काम बंद पडले आहेत. तसेच गावात अनेक ठिकाणी जागो जागी खोदकाम केल्या असल्याने गावातील शाळकरी विद्यार्थी, वृक्ष तसेच दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या बांधकामाचे ई-टेंडरींग झाल्यानंतरही तीन महिने कामाला सुरूवातच झाली नव्हती. त्यानंतर गावकऱ्यांच्या संतापानंतर कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली. परंतु पुन्हा काही कारणास्तवा जलवाहिनीचे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात अड्याळवासीयांना रहदारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत सदर कामाचे ई-टेंडरींग झाले असताना कामाला दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहे.त्यामुळे आणखी किती दिवस नाहक त्रास सहन करायचा, असा सवाल गावकरी करीत आहे. सदर कामावर असणारे मजूर काम सोडून गेल्याचे कारण सांगण्यात येते. परंतु गावकऱ्यांना यासर्व घटनेमुळे गत सहा महिन्यांपासून त्रास होत आहे. याबद्दल गावकºयांनी अनेकदा प्रशासनाकडे वारंवार विचारणा करूनही अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. अनेकदा ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामप्रशासन अधिकाºयांकडे याबाबत विचारणा केली असता नेमकी माहिती गावकºयांना दिली जात नाही.तसेच कंत्राटदार कामासंबंधी विचारणा करताच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने गावकºयांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत सदर कामासाठी गावातील जागू शेख, नितीन वरगंटीवार, ग्रामपंचायत सदस्य पंकज ढोक, पुंडलिक करंजेकर आदींनी निवेदन देवून काम त्वरीत सुरू करण्याची मागणी केली आहे. रखडलेले बांधकाम वेळेत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.सदर कंत्राटदाराला पत्र दिले असून काम वेळेत पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.डी.डी. ढवळे, कनिष्ठ अभियंता, पवनी.अड्याळमधील खोदकाम करून ठेवलेले काम दोन ते चार दिवसात पूर्ण होईल, अशी कंत्राटदाराकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार सुचना देण्यात आल्या आहे.सतीश मारबते, उपविभागीय अभियंता, पवनी.
जलवाहिनी बांधकामाने अड्याळवासी झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:32 PM
अड्याळ येथील मुख्य जलवितरण वाहिका जीर्ण झाल्यामुळे पेयजल राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनंतर्गत ६७ लाख रूपयांची नवीन मुख्य जलवितरण वाहिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. गत सहा महिन्यांपासून बांधकामाला सुरूवात झाली असली तरी यामध्ये अनेकदा व्यत्यय येवून काम बंद पडले आहेत. तसेच गावात अनेक ठिकाणी जागो जागी खोदकाम केल्या असल्याने गावातील शाळकरी विद्यार्थी, वृक्ष तसेच दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देसहा महिन्यांपासून बांधकाम थंडबस्त्यात : विद्यार्थी, वृद्धांना नाहक त्रास