लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा समाज अशिक्षितपणामुळे पारंपारिक मासेमारीच्या व्यवसाय करून जीवन जगत आहे. मात्र भाजप सरकारचे या समाजाकडे दुर्लक्ष असल्यामुळे तलावांच्या लीजमध्ये दिवसेंदिवस सात ते आठ पटीने वाढ होत आहे. शासनातर्फे ही लीज माफ झाली पाहिजे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करते. मात्र येत्या काळात मच्छीमार संस्थेची लीज कायमस्वरूप्ी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय व तलाव बचाव संघर्ष समिती भंडारा- गोंदिया व जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने मंगलमुर्ती सभागृह साकोली येथे धनादेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक प्रशांत पवार, जिल्हा परीषद सभापती रेखा वासनिक, सभापती प्रेमदास वनवे, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मंदा गणवीर, मदन रामटेके, प्रा. संजय केवट, चुन्नीलाल वासनिक उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, मागील वर्षी पाऊस अत्यल्प प्रमाणात आला. त्यामुळे तलावात पाणीच साचले नाही. यावर्षीही समाधानकारक पाऊस आला नाही. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात जमा झालेले पाणी दिवाळीपूर्वीच अर्ध्यापेक्षा कमी होते. त्यामुळे मासेमार बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे. कारण लीज ही पाण्याची दिली जाते. रिकाम्या तलावाची नाही. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषद भंडारातर्फे काही निर्णय घेतला की मागील वर्षी ज्या मच्छिमार संस्थाकडून शासनाने जी लीज घेतली होती ती लीज यावर्षी न घेता मागील वर्षाची संपूर्ण लीजची रक्कम त्या संस्थांना परत करायची हा निर्णय झाला.या कार्यक्रमाप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी, भंडारा व पौनी तालुक्यातील एकूण १६० मच्छीमार संघटनांचे १८ लाख ३० हजार रूपयेची लीज धनादेशाद्वारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव वलथरे यांनी केले. कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील मासेमार समाजबांधव उपस्थित होते.
मच्छिमार संस्थेची लीज माफ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:43 PM
मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा समाज अशिक्षितपणामुळे पारंपारिक मासेमारीच्या व्यवसाय करून जीवन जगत आहे.
ठळक मुद्देनाना पटोले : १६० मच्छिमार संघटनांचे १८.३० लाखांची लीज धनादेशाद्वारे केली परत, साकोली येथे धनादेश वितरण कार्यक्रम