प्रशांत देसाई। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रविवार शासकीय सुटीचा दिवस... सकाळी कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने चेहºयावर रुमाल बांधलेला... सगळीकडे नजर टाकल्यानंतर हातात झाडू घेऊन लगेच साफसफाई करायला सुरुवात केली... त्यानंतर शौचालयातील ब्रश हातात घेऊन खराब झालेले शौचालय व मुत्रीघर स्वच्छ केले. हा प्रकार तुमसर पंचायत समितीमध्ये रविवारी घडला. ही साफसफाई करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रथम श्रेणी अधिकारी असलेले खंड विकास अधिकारी आर.एम. दिघे हे होते.बातमीचा पहिला परिच्छेद वाचून आश्चर्यचकीत झाले असाल. मात्र ही बाब सत्य आहे. भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात राबविण्यात येत आहे. आपल्या हातून झालेली अस्वच्छता मजुराकडून नेहमी करवून घेतली जाते. मात्र या स्वच्छता मोहिमेत अनेक अधिकारी केवळ आदेश देऊन स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग करताना आजपर्यंत बघायला मिळाले. या बाबीला फाटा देत तुमसर पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी आर.एम. दिघे व सहाय्यक गटविकास अधिकारी एम.एस. माहोर यांनी राबविलेली स्वच्छता अभियान मोहीम सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी खरोखरच आदर्श ठरावी अशीच होती.स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत जिल्हा ते ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने तुमसर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी दिघे व सहाय्यक गटविकास अधिकारी माहोर यांनी भंडारावासीयांसाठी नवा आदर्श समोर ठेवला आहे.रविवार शासकीय सुटीचा दिवस असतानाही या अधिकाºयांनी अभियान राबविण्यासाठी सकाळी कार्यालय गाठले. पंचायत समितीमध्ये विविध विभागांची पाहणी केल्यानंतर सर्वत्र अस्वच्छता दिसून आल्याने या अधिकाºयांनी हातात झाडू घेऊन कार्यालयाची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यालय स्वच्छ झाल्यानंतर त्यांनी प्रसाधनगृहाची स्वच्छता केली. याकरिता त्यांनी आपल्या पदाचा गर्व न करता हातात ब्रश घेऊन शौचालयाची स्वच्छता केली. यानंतर महिला कर्मचाºयांच्या प्रसाधनगृहाचीही स्वच्छता केली.मोहिमेची अंमलबजावणी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रथम श्रेणी अधिकारी स्वच्छता अभियानात सहभागी झाले हे बघून तिथे उपस्थित अन्य कर्मचाºयांना प्रथम आश्चर्य वाटले. आजपर्यंतच्या इतिहासात कुठलाही अधिकारी हा केवळ निर्देश देतो. मात्र तुमसर पंचायत समितीच्या या दोन्ही अधिकाºयांनी स्वत: काम करण्यासाठी पुढाकार घेतल्याने अन्य कर्मचाºयांनीही हातात झाडू व फावडे घेऊन परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
बिडीओंचा असाही ‘आदर्श’ पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:48 PM
रविवार शासकीय सुटीचा दिवस... सकाळी कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने चेहºयावर रुमाल बांधलेला...
ठळक मुद्देतुमसर पंचायत समितीचा उपक्रम : कर्मचाºयांनी श्रमदान करून केली स्वच्छता