आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनील मेंढे, तहसीलदार संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, एनबीसीसीचे के.पी.एस.स्वामी व सरपंच उपस्थित होते.गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत मौजे पिंडकेपार ता. जि. भंडारा , पुनर्वसन गावठाण, बेला, मौजा सालेबर्डी, पुनर्वसन गावठाण शहापूर, मौजे करजखेडा, पुनर्वसन गावठाण गिरोला भिलेवाडी, मौजे टेकेपार, पुनर्वसन गावठाण चिरवहा या पुनर्वसनाचे भूमिपूजन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, नागरी सुविधांचा हा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. नागरी सुविधांची कामे एनबीसीसी या कंपनीमार्फत करण्यात येत असून ती गुणवत्ता पूर्ण असतील. ही कामे १२ महिन्यात पूर्ण करण्यात येतील. हे पुनर्वसन आदर्श असेल असे ते म्हणाले.आमदार फुके म्हणाले, या ठिकाणी २६० भूखंड विकसित करण्यात येणार आहे. त्यापैकी २२० लाभार्थ्यांना मिळतील. येथील नागरिकांची वाढीव दराने मोबदला देण्याची मागणी आहे. याबाबत ६ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असून स्टे मिळाला नाही तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम करण्यात येणार आहे. पुनर्वसनाचे काम उत्तम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोसीखुर्दच्या पुनर्वसनासाठी शासनाने २५८ कोटी मंजूर केले असून पुनर्वसित गावांसाठी १८ सुविधा पुरविल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून विकासाच्या कामात सहकार्य दयावे, असे आवाहन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. ३४ बाधीत गावांपैकी २८ गावांमधील पुनर्वसनाची कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या चार गावांचे पुनर्वसन झाले नव्हते. पुनर्वसनाचे काम दजेर्दार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
‘त्या’ गावांचे आदर्श पुनर्वसन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:44 PM
भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम