लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खासगी रुग्णालयात अवाजवी देयके आकारल्या जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे. रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देयकांची तपासणी करण्यासाठी पथक तयार करुन प्रसंगी रुग्णांची लूट करणाºया रुग्णालयाचा परवाना रद्द करावा आणि आकारलेले अतिरिक्त पैसे रुग्णांना परत मिळवून द्यावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.येथील जिल्हा परिषेदच्या सभागृहात कोरोनासह विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते गुरुवारी बोलत होते. बैठकीला पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, नाना पंचबुध्दे आदी उपस्थित होते.कोरोना काळात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. देयकांची तपासणी करण्यासाठी उपविभाागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार पुढील काही दिवसात कोरोना रुग्णांचा दर वाढणार आहे. याबाबत प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करुन मृत्यू संख्या कमी करण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश दिले आहेत.नागरिकांनी स्वत: पुढे येवून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. जास्तीत जास्त तपासणी करण्यावर भर द्या, माझे कुटुंब, माझी जबाबदार या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.या बैठकीत पूरपस्थिती, मदत वाटप, धान खरेदी, मामा तलावातील गाळ काढणे, कृषी विषयक जोडण्या आदींचा आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी कोविड-१९, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. संचालन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी केले.दीड लाख रुपये मिळतात ही केवळ अफवाकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमागे दीड लाख रुपये मिळतात, असे सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविले जात आहे. ही केवळ अफवा असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, सोशल मिडीयावर अशा पध्दतीने अफवा पसरविण्याºयावर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश नाना पटोले यांनी या बैठकीत दिले आहे.मनातील भीती दूर कराकोरोनाबाबत नागरिकांच्या मनात भीती असून प्रशासनाने ही भीती दूर करण्यासाठी जागृती मोहीम राबवावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
तर रुग्णालयाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 5:00 AM
कोरोना काळात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. देयकांची तपासणी करण्यासाठी उपविभाागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार पुढील काही दिवसात कोरोना रुग्णांचा दर वाढणार आहे.
ठळक मुद्देनाना पटोले : कोरोनासह विविध विषयांवर आढावा बैठक, रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना तंबी