भाजपच्या किसान सेलच्या वतीने धान चुकाऱ्यासाठी येथील जुनी पंचायत समितीच्या प्रांगणात गुरूवार पासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या सांगता कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी आमदार बाळा काशीवार ,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, नेपाल रंगारी, नगराध्यक्ष धनवंता राऊत, मनीष कापगते ,किशोर पोगळे, तालुका अध्यक्ष लखन बर्वे, रवी परशुरामकर, नरेंद्र वाडीभस्मे, ॲड. अवचते उपस्थित होते. भाजपाच्या किसान सेल तर्फे शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळण्यात यावे, बोनसची उर्वरित रक्कम तत्काळ मिळावी, कृषी संशोधकांना प्रोत्साहन राशी ५० हजार रुपये देण्यात यावे यासाठी उपोषण करण्यात आले. या उपोषणाची दखल घेत शासनातर्फे तहसीलदार रमेश कुंभरे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. निवेदन स्वीकारून आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात उपोषणाचा समारोप करण्यात आला.
धानाचे चुकारे मिळाले नाहीतर जिल्हा कचेरीसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:40 AM