शासनाने उन्हाळी धान खरेदी करून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे दिलेले नाहीत. बोनसची ही अर्धी रक्कम शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उधार उसने व सावकाराकडून कर्ज काढून कसेबसे पावसाळी धानाची रोवणी केली. मात्र, आता कीटकनाशक औषध व खताकरिता शेतकऱ्यांकडे रोख पैसे नाहीत. धान पीक वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना धानाचे ५० टक्के बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना रब्बी (उन्हाळी) धानाचे चुकारे व राहिलेला ५० टक्के बोनस शेतकऱ्यांना तत्काळ देऊन शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर करावे, अशी मागणी केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत धानाचे चुकारे शेतकऱ्यांना न मिळाल्यास १ सप्टेंबरला परिसरातील शेतकरी मिळून बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेतील, असा इशारा तोफलाल रहांगडाले व शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
धानाचे चुकारे व बोनस न मिळाल्यास जलसमाधी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:41 AM