लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्वच मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी कोणी मतदान केंद्रावर पार्टी केली तर त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ५० उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमाविण्यासाठी उडी घेतली आहे. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक विभाग दक्षता घेत आहे. आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, चेकपोस्टवर तपासणी मोहीमही राबविली जात आहे.
शिवाय मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते एक दिवस अगोदरच केंद्रावर जाणार आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
११६७ मतदान केंद्र जिल्ह्यात
- जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत ११६७ केंद्रे आहेत.
- भंडारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४३५ मतदान केंद्रे आहेत.
मागील निवडणुकीत काही केंद्रांवर धिंगाणा तुमसर व लाखांदूर तालुक्यांतील एक ते दोन मतदान केंद्रांवर गत निवडणुकीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. तेथेही बंदोबस्त राहणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे आहे. निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक कामासाठी अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. ते एक दिवस अगोदर केंद्रावर जाणार आहेत.
सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे
३ दिवस ड्राय डे...
- मतदान प्रक्रियेदरम्यान दारू पिणाऱ्यांमुळे कायदा-सुव्यवस्था निर्माण होऊ शकते.
- ही बाब पाहता मतदान प्रक्रियेदरम्यान तीन दिवस ड्राय डे राहणार आहे.