आर्थिक परिस्थिती नसतानाही स्मार्टफोनचा वापर वाढलेला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नादात प्रत्येक तरुणाच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. सकारात्मक कामानंतर नकारात्मकतेच्या दृष्टीने स्मार्टफोनचा वापर अधिकच होताना दिसत आहे. बऱ्याच वेळा आर्थिक लूटसुद्धा स्मार्टफोनच्या माध्यमातून पुढे आलेली आहे, अशी अनेक प्रकरणं पोलिसांकडे येत आहेत. तेव्हा सोशल मीडियावरून मिळालेल्या आमिषाला बळी न पडता वास्तविकतेचे भान ठेवत स्मार्टफोनचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी फेसबुक फ्रेंड्स किंवा रिक्वेस्ट खात्री केल्याशिवाय स्वीकारू नये. फेसबुक फ्रेंडकडून फेसबुकवर पैशाची मागणी झाल्यास आपल्या मित्राला फोन करून खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नका. बनावट फेसबुक खाते तयार करून पैसे उकळण्याचे प्रकार पोलिसांच्या नजरेसमोर आहेत. फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम यावरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातीची खात्री केल्याशिवाय पैशाचा व्यवहार करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
बॉक्स
हेल्पलाइनची मदत घ्या
आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच १५५२६० या हेल्पलाइनवर संपर्क साधत घडलेला प्रकार सांगा. तीन तासांच्या आत तक्रार केली तर तुमचे गेलेले पैसे परत मिळू शकतात. एटीएमचा पीन कोणाला देऊ नका किंवा एटीएम कार्डवर पीन नंबर नोंद करून ठेवू नका, असे आवाहन पोलिसांच्यावतीने केले आहे.
आधुनिक तांत्रिक युगात स्मार्टफोनचा दुरुपयोग वाढलेला आहे. यात दररोज लुबाडणुकीचे प्रकार समोर येत आहेत. तेव्हा सावध होत काळजीपूर्वक ऑनलाइन व्यवहार करा. चुकीच्या व्यक्तीला ओटीपी देऊ नका. समोरच्या व्यक्तीची ओळख असल्याशिवाय व्यवहार अथवा तांत्रिक देवाण-घेवाण करू नका.
मनोज सिडाम, ठाणेदार पालांदूर.