शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे तापावे

By admin | Published: February 03, 2017 12:44 AM

चांगले उद्दिष्ट असेल तर पुढील आयुष्य चांगले जाते. ज्ञान, शील, सेवा आणि श्रम, प्रतिष्ठा जीवनात फार महत्त्वाची आहे.

ब्रम्हानंद करंजेकर यांचे प्रतिपादन : करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसीचा वार्षिकोत्सवसाकोली : चांगले उद्दिष्ट असेल तर पुढील आयुष्य चांगले जाते. ज्ञान, शील, सेवा आणि श्रम, प्रतिष्ठा जीवनात फार महत्त्वाची आहे. याकरिता आहार, विहार आणि विचार याला महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यातील ध्येय चांंगले असेल तर जीवनाची गुणपत्रिका मेरीट येते. याकरिता सूर्यासारखे तेज असावे. सूर्यासारखे चमकायचे असेल तर त्याकरिता सुर्यासारखे आधी जळावे लागेल, असे प्रतिपादन वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्था अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांनी केले. येथील बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसीवतीने आयोजित केलेल्या वार्षिकोत्सव उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्याचे उद्घाटन संस्था सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन. जे. गायकवाड, गोपाल दवे, संस्था सदस्य देवचंद करंजेकर, एलएमसी सदस्य लोकानंद नवखरे, प्रा. आतिष शहारे, वार्षिकोत्सव प्रमुख प्रा. संजय आकरे, विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश कोरे उपस्थित होते.फीत कापून वार्षिकोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी देवी प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांनी आपआपल्या क्षेत्रातील अनुभव कथन करुन यथोचित मार्गदर्शन केले. डॉ. करंजेकर म्हणाले, जेवढे शिक्षण तेवढेच आयुष्य चांगले असून मानवी जीवन खजूराच्या झाडासारखे असण्यापेक्षा आंब्याच्या झाडासारखे बहरलेले असावे. रुपवान, बुध्दीवान, कर्तुत्वान, धनवान आणि गुणवान अशी आयुष्यगणीक पचसुत्री असली पाहिजे. कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन प्रा. आतिश शहारे, सुत्रसंचालन प्रा. अनिल साव, आभार प्रदर्शन प्रा. शिशुपाल बोधनकर यांनी केले. उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. भोजराजे सातपूते, प्रा. तुळसीदास निंबेकर, प्रा. चंद्रशेखर चकोले, प्रा. तुषाली गभणे, प्रणय कोरे, रवी भोंगाने, संगम बावनकर, शुभम चांदेवार यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)