शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

लाखनीच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Published: April 15, 2015 12:28 AM

लाखनी येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : लाखनीवासीयांचे तहसीलदारांना निवेदनभंडारा : लाखनी येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत. पाणी, स्वच्छता यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. समस्या सोडविण्यात याव्यात, या आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी समस्यांचे निवेदन तहसिलदारांना दिले.लाखनी ग्रामपंचायतीचे लाखनी नगर पंचायतीत रूपांतर झाले. ज्याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. परंतु त्याचसोबत लाखनी नगरपंचायत समस्यांचे माहेरघर बनत चालली आहे.लाखनी ग्रामपंचायतीत कामावर असणाऱ्या सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. ज्यामुळे आज जवळपास दोन महिन्यांपासून लाखनी गावात नाल्यांची साफ सफाई झालेली नाही. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. नाल्या तुडूंब भरून नाल्यांचा पाणी रस्त्यावर वाहत आहे. ज्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येवून विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे सायंकाळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो ज्यामुळे विशेषत: महिला व मुली भययुक्त वातावरणात वावरत आहेत. अनेक निर्जनस्थळी अंधार असल्यामुळे महिलांनी तेथून जाणे येणे बंद केलेले आहे. गावातील बोरवेल बंद असल्यामुळे महिलांना दूर दूरपर्यंत पिण्याच्या पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून घरी येणाऱ्या महिलांना दूरवर जावून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शासकीय कामांसाठी लोकांना विविध दाखल्यांची आवश्यकता लागत आहे. परंतु कार्यालयात प्रशासक असल्यामुळे प्रत्येक दाखल्यांसाठी अर्ज मागत आहेत. इतकेच नव्हे तर ज्या दाखल्यांकरीता अर्जाची आवश्यकता नाही. रेकॉर्ड पाहूनही दाखले दिले जाऊ शकतात. अशा दाखल्यांकरीताही अर्ज मागविले जातात. अर्ज दिल्यानंतर २-३ दिवस लोकांना दाखले मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना नगर पंचायत कार्यालयाच्या २-३ दिवस वारंवार चकरा माराव्या लागत आहेत तरीही लोकांची कामे पूर्ण होत नाहीत. काही कर्मचारी परस्पर पैशाची देवाण घेवाण करून तात्काळ दाखले उपलब्ध करून देत आहेत.नगर पंचायतच्या गलथान व नियोजनशुन्य कारभारामुळे मागील २ महिन्यांपासून लाखनी गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्यात अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. सर्व सफाई कामगारांना पूर्ववत कामावर बोलावण्यात यावे, बंद असलेले पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात यावे, बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी, साधा अर्ज घेवून त्वरीत दाखले देण्यात यावे, कार्यालयात लागणारे सर्व साहित्य कर्मचाऱ्यांना त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)