लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कारधा, अड्याळ, करडी, तुमसर, मोहाडी परिसरात अवैध व्यवसायावर धाडी घालून महाराष्ट्र जुगार कायद्याखाली पाच गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ हजार ३८४ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांच्या पथकाने केली.याशिवाय दारुबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे नोंदविले असून त्यामध्ये दोन आरोपींकडून ६३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तुमसर येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन त्यांचेकडून २,२,०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. असे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध व्यावसायिकांकडून २ लाख ७९ हजार ८४ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौंदड येथे जुलै रोजी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांची नियुक्ती करून त्यांना जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह विविध ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी घालून आरोपीविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे नोंद करून आरोपींना जेरबंद केलेले आहैे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे मानकर यांनी सांगितले.
अवैध व्यावसायिकांकडून २.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:05 PM
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कारधा, अड्याळ, करडी, तुमसर, मोहाडी परिसरात अवैध व्यवसायावर धाडी घालून महाराष्ट्र जुगार कायद्याखाली पाच गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ हजार ३८४ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांच्या पथकाने केली.
ठळक मुद्देआठ आरोपींना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई