बावनथडी नदीतून दररोज ५० ते ६० ट्रॅक्टर रेतीचा उपसा
तुमसर : तुमचं तालुक्यातील धुटेरा येथे बाव न थ डी नदी वाहते या नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दररोज ५० ते ६० ट्रॅक्टर रेतीचा उपसा केला जातो. परंतु अद्यापही महसूल प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
धुटेरा येथील रेती घाटातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे.
दर दिवशी ६० ट्रॅक्टर रेती चोरली जाते. परंतु त्याकडे अजूनही महसूल प्रशासनाचे लक्ष गेले नाही. त्यामुळे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. मागील काही दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले असून ट्रॅक्टर चालकांची मुजोरी सुद्धा सुरू आहे. कुणी काहीच करू शकत नाही या तोऱ्यात सध्या ते वागत आहेत. यांना येथे अभ य असल्याचे दिसून येते.
रेतीचा उपसा केल्यानंतर स्थानिक स्तरावर काही प्रमाणात येथे विक्री करण्यात येते तर मोठ्या प्रमाणात येते शहराकडे जात आहे संघटित रुपात येथे येथे चोरीच चा धंदा सुरू आहे. घरावरील भरारी पथक सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.