शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

साकोलीत अवैध रेती तस्करी सुरुच

By admin | Published: April 20, 2017 12:46 AM

जिल्ह्यात अवैध रेतीतस्करी रोखण्यात प्रशासनाची धडक मोहीम सुरु असली तरी साकोली तालुक्यात मात्र अवैध रेती चोरांना अभय मिळत आहे.

तहसीलदारांचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपलीसंजय साठवणे साकोली जिल्ह्यात अवैध रेतीतस्करी रोखण्यात प्रशासनाची धडक मोहीम सुरु असली तरी साकोली तालुक्यात मात्र अवैध रेती चोरांना अभय मिळत आहे. त्यामुळे रात्री दिवसा खुलेआम रेतीचोरी सुरु असून शासनाला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबवा, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला साकोली तालुक्यात केराची टोपली दाखविण्यात येत आहे.साकोली तालुक्यातील परसोडी, पोवारटोली व एक असे एकुण तीनच रेतीघाट लिलाव झाले आहेत. या रेती घाटावरूनही रॉयल्टी एवढी टोकनवर रेती आणली जाते. तर उर्वरीत महालगाव, लवारी, उमरी, धर्मापुरी, गोंडउमरी, मोहघाटा या रेतीघाटावरून अवैधरित्या रेती खोदली जात आहे. या रेतीचोरीच्या अनेक तक्रारी तहसील कार्यालयात केल्या जातात. मात्र एक दिवस कार्यवाहीनंतर दुसऱ्या दिवशी मात्र मैदान पुन्हा मोकळे सोडले जातात. त्यामुळे रेतीतस्कर रात्रंदिवस रेतीचोरी करीत आहेत.चौकी स्थापनच झाली नाहीज्या घाटांचे लिलाव झाले नाही अशा रेतीघाटावर महसूल विभागामार्फत चौकी बसविण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतरही तहसील विभागामार्फत चौकी बसविण्यात आली नाही. त्यामुळे या अवैध रेती चोरीला तहसील कार्यालयाची मुक संमती आहे हे स्पष्ट आहे.दिवसभर गस्त नाहीसाकोली तालुक्यात दिवसा व रात्री फिरते पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात मंडळ अधिकारी, तलाठी व पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे फिरते पथक दिवसा व रात्री फिरतानी दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी.संबंधित तलाठ्यांवर कारवाई कराज्या रेतीघाटावरून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. त्या घाटापासून किती रेती चोरी करण्यात आली. याची तपासणी करून जेवढी रेती चोरी झाली त्या रेतीची किंमत संबंधित तलाठ्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गिट्टी व मुरुमाचे अवैध खननतालुक्यात रेतीप्रमाणेच गिट्टी व मुरुमाचेही अवैध खनन सुरु आहे. बिना रॉयल्टी मुरुम व गिट्टीचे उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. याचीही चौकशी करण्यात यावी.