शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

रामपुरात भरतो जनावरांचा अवैध बाजार

By admin | Published: June 06, 2017 12:25 AM

सध्या देशात बैलांसह गायींची खरेदी विक्री करून हत्या करण्यावर निर्बंध लागले आहे.

प्रशासन मूग गिळून : कामठी येथे कत्तलखान्याकडे जनावरांची रवानगी, दलालाचे मोठे रॅकेट सक्रियमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या देशात बैलांसह गायींची खरेदी विक्री करून हत्या करण्यावर निर्बंध लागले आहे. परंतु तुमसर तालुक्यातील रामपूर (आंबागड) येथील बाजारात नियमबाह्य जनावरांची खरेदी विक्री सुरु आहे. ही जनावरे राजरोसपणे कत्तलखान्याकडे नेली जात आहेत. जंगलव्याप्त गावात सदर बाजार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे हे विशेष.तुमसर तालुक्यात केवळ तुमसर शहर तथा सिहोरा येथेच गुरांचा बाजार भरतो. रामपूर येथे गुरांचा बाजार भरविण्याची शासनाची परवानगी नाही. ग्रामस्थांनीही येथे विरोध केला असून ग्रामपंचायतीत येथे परवानगी नाही अशी माहिती आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून राजरोसपणे आठवडी बाजाराच्या दिवशी मोठा जनावरांचा येथे बाजार भरत आहे. जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी होते. विशेषत: ही सर्व जनावरे कामठी येथे नेली जातात अशी माहिती आहे.रामपूर हे गाव सातपुडा पर्वत रांगात असून जंगलव्याप्त परिसरात आहे. प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. दुर्लक्षाची कारणे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनावरांना वाहून नेणाऱ्या वाहनांच्या रांगा येथे लागल्या असतात. जंगल मार्गाने वाहने कामठी येथे जातात. जनावरांची खरेदी विक्री करणारे येथे दलाल सक्रीय आहेत. मध्यप्रदेशातूनही येथे जनावरे आणली जात आहेत. शेतीला उपयोगी जनावरे विक्रीला येत नाही अशी माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांने ‘लोकमत’ला दिली.खरेदी विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट येथे असल्याचे सामान्य विक्रेता येण्यास धजावत नाही. प्रशासनाला हे सर्व माहित आहे. परंतु येथे कारवाई झाली नाही. बैल बाजारात दलालांची व खरेदीदारांची गर्दी येथे पाहायला मिळते. प्रशासनाने या दलालांपुढे नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे. अवैध भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर येथे कारवाई करण्याची गरज आहे. गोरक्षण कार्यकर्त्यांचे मौन हा येथे संशोधनाचा विषय आहे. या बाजाराला कुणाचा आशीर्वाद आहे हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो.