लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात सध्या अवैध खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून रेती, मुरूम व मातीचे दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात खनन सुरू आहे़ याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून यामुळे शासनाला लाखो रूपयाचे नुकसान होत आहे़ साकोली येथील महसूल विभागाचे अधिकारी अवैध खनन थांबवतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़साकोली तालुका नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे़ परिसरात टेकड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून या टेकड्यांमधून सर्रास मुरमाचे अवैध उत्खनन केल्या जाते़ तसेच नवीन ले-आऊटसाठी लागणारी मातीसाठीही अवैध उत्खनन केले जाते़ त्यामुळे टेकड्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे़ रेतीघाट बंद असले तरी रेतीची वाहतुक सर्रास सुरूच आहे़ अवैध उत्खननामुळे शासनाला लाखोंचा तोटा होत आहे़ तशीही महसूल विभागामार्फत कुठलीही कार्यवाही केली जात नाही़ साकोली परिसरात मुरूमाच्या उत्खननासाठी मुरमाची लीज काढली जाते़ ही लीज काढतानी ५० ब्रास १०० ब्रास अशी काढली जाते़ लिजच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून माफिया पैसे कमवित आहेत़ मात्र महसूल विभागातर्फे लिजची तपासणी करीत नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे.साकोली तालुक्यात मुरुमांचे उत्खनन जोमात सुरु असले तरी याकडे महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.रॉयल्टी नाही तरीही घाट सुरूचसाकोली तालुक्यातील रेतीघाटांचे लिलाव रखडले आहे. प्रकरण न्यायालयात असल्याची चर्चा आहे. रेतीघाटाची रॉयल्टी अजुनपर्यंत रेतीघाट मालकांना मिळाली नाही़ तरीही रेतीघाटावरून रेतीचे उत्खनन सुरूच आहेत तर रेती घाटावरून रेती नेण्याची संमत्ती कोण देत आहे़ रेतीचे पैसे घेतले जातात का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे़ यासर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे़
गौण खनिजांचे अवैध खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:34 PM
तालुक्यात सध्या अवैध खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून रेती, मुरूम व मातीचे दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात खनन सुरू आहे़ याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून यामुळे शासनाला लाखो रूपयाचे नुकसान होत आहे़ साकोली येथील महसूल विभागाचे अधिकारी अवैध खनन थांबवतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़.
ठळक मुद्देसाकोली तालुक्यातील प्रकार : महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, महसूल बुडाला