शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

लवारी घाटातून रेतीचे अवैध खनन

By admin | Published: March 29, 2017 12:41 AM

तालुक्यातील लवारी रेतीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असून शासनाच्या तिजोरीला लाखो रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे.

महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष : साकोली तालुक्यातील प्रकारसाकोली : तालुक्यातील लवारी रेतीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असून शासनाच्या तिजोरीला लाखो रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र याकडे महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष आहे.साकोली तालुक्यात फक्त तीन रेतीघाटाचे लिलाव झाले असून या तीनही रेतीघाटावरून विना रॉयल्टी रेतीचे अवैध खनन सुरू आहे तर या रेतीघाटावरून टोकनचे पैसे वाचावे यासाठी रेती माफिया अवैध मार्गाचा वापर करीत तालुक्यातील धर्मापुरी व लवारी या रेतीघाटावरून रात्री व पहाटे अवैधरित्या रेती उत्खनन करीत आहेत. या रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन होत आहे. हे खनन राजरोसपणे सुरू असताना देखील संबंधित विभाग शांत कसे काय, असा प्रश्न आह ेव कधी काळी महसूल विभागाने ट्रॅक्टर पकडले तरीही दंड वसुल ट्रॅक्टर सोडून दिले जातात. परिणामी तस्कराची हिम्मत वाढते जर या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली तर या अवैध व्यवसायावर काही प्रमाणात आळा बसू शकतो तर रेती घाटावरूनही विना रॉयल्टी टोकणवर ट्रॅक्टर सोडले जातात याचीही चौकशी झाली पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)रेतीसाठ्याची चौकशी करण्याची मागणीतालुक्यात बऱ्याच ठिकाणी रेतीचे अवैध साठे तयार करून ठेवण्यात आले आहेत. ही रेतीसाठे अवैध असून यावर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.साकोली तालुक्यातील रेतीमाफियांचे महसूल व पोलीस प्रशासनाशी असलेले संंबंध व पैशाची देवाणघेवाण यामुळे तालुक्यात अवैध रेती खनन राजरोसपणे सुरू आहे. आज सकाळी लवारी रेतीघाटावर पोलिसांना दोन ट्रॅक्टर पकडले व चिरीमिरी घेऊन कारवाई न करताच ट्रॅक्टर सोडून दिले.