रेती उपसा व वाहतूक सुरुच : पोलिसांनी केली होती फौजदारी कारवाईमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) येथील बंद रेती घाटावरून रेतीचा अवैध उपसा करून नदीघाटावरील वनविभागाच्या जागेत रेतीचा अवैध साठा करणे सुरु आहे. पोलीस विभागाने या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून यंत्र सील केले. रेतीसाठा लिलाव प्रक्रिया करण्यासंदर्भात येथे हालचाली सुरू आहे. हा घाट ३० सप्टेंबर रोजी बंद झाला होता.तामसवाडी येथून वैनगंगा नदी वाहते. तामसवाडी येथे विस्तीर्ण नदीपात्र आहे. महसूल विभाग दरवर्षी रेतीघाट लिलाव करीत आहे. यावर्षी ३० सप्टेंबरला रेती घाट बंद झाले. परंतु नदी पात्रातून रेती उपसा नियमबाह्यपणे मात्र सुरुच आहे. नदीपात्रातून रेती उपसा केल्यावर वनविभागाच्या जागेत नदी काठावर रेती डंपींग (साठा) करून ठेवण्यात आला. रेती साठ्यावर महसूल व पोलीस विभागाने कारवाई केली. एक मशीन सील करण्यात आली. पुन्हा या रेती घाटावरून अवैध रेती उपसा झाला आहे. डम्प करून ठेवलेली रेती नियमबाह्यपणे विक्री करणे सुरु आहे.पाच ते सहा ट्रॅक्टर येथून रेती विक्री करीत आहे. रेती व्यवसाय करणारा संबंधित दबंगगिरी करीत आहे. रेती साठवणूक केल्यावर येथे रेती साठा लिलाव प्रक्रियेकरिता प्रयत्नशील असल्याचे समजते. जिल्हास्तरावरून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते. रेती घाट बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणात रेती घाटातून रेती साठवणूक करण्यात येते. नंतर ही रेती विकणे, रात्री नदी पात्रातून डम्प केलेल्या ठिकाणी रेती उपसा करून ठेवणे, रेती साठा लिलाव प्रक्रिया सोपस्कार पार पाडणे असा हा क्रम येथे राबविण्यात येते. मध्यप्रदेशात रेती घाट सुरु आहे. तपासणी अंती काही रेती वाहतूक करणाऱ्यांकडे टी.पी. मिळाल्याची माहिती आहे. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा ताफा आहे. तरी अवैध रेती उपसा, रेती साठवणूक करणे व रेती वाहतूक सर्रास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)
तामसवाडी येथे रेतीचा अवैध साठा
By admin | Published: October 21, 2016 12:39 AM