लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील मुरमाडी/ सावरी येथील शासकीय नाल्याच्या किनाऱ्यावरील वृक्षाची अवैधपणे कत्तल करुन त्याची विल्हेवाट लावणाºया सचिन पडोळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रमा विश्वनाथ पडोळे यांनी तहसिलदार, पोलिस निरीक्षक, वनपरिक्षेत्रधिकारी यांच्याकडे केली आहे.गैरअर्जदार सचिन पडोळे यांनी शासकीय नाल्याजवळचा गट क्र. ११५४१२ आराजी ०.३५ हेक्टर जवळच्या नाल्याच्या तिरावरील बाभुळ, अंजन, उमर अशा पाच वृक्षांची कत्तल अवैधपणे करुन त्याची विल्हेवाट लावलेली आहे. महसूल विभागाच्या अखत्यारीत येणाºया नाल्याच्या काठावरील झाडे गैरअर्जदाराने विनापरवानगीने तोडले आहे. गैरअर्जदार सचिन पडोळे यांनी तक्रारकर्ते रमा पडोळे यांच्या शेतातील ४५ ते ५० सागवान वृक्षांवर खाचे मारून ठेवल्याचा आरोप केला आहे. गैरअर्जदाराने शासकीय मालमत्तेची हानी केली आहे तसेच विनापरवानगीने झाडे तोडून वनविभागाच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने गैरअर्जदारावर कारवाई करण्याची मागणी वनविभाग व तहसिलादारांकडे तक्रारीतून केली आहे.पडोळे यांच्या तक्रारीवरून नाल्यावरील वृक्षांची अवैधपणे कत्तल झाली काय, याबाबत मोका तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार गुन्हेगारांचा शोध घेवून वनविभागातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.-वाय.एस. खोटेले, वनक्षेत्रसहाय्यक, लाखनी.
शासकीय जागेवरील वृक्षांची अवैध कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:57 PM
तालुक्यातील मुरमाडी/ सावरी येथील शासकीय नाल्याच्या किनाऱ्यावरील वृक्षाची अवैधपणे कत्तल करुन त्याची विल्हेवाट लावणाºया सचिन पडोळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रमा विश्वनाथ पडोळे यांनी तहसिलदार, पोलिस निरीक्षक, वनपरिक्षेत्रधिकारी यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : मुरमाडी नाल्यावरील प्रकार