शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जवाहरनगर परिसरात वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:44 PM

वनविभागाची परवानगी न घेता वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली.

ठळक मुद्देदोन ट्रॅक्टर पकडले : भंडारा वनविभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनविभागाची परवानगी न घेता वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली. या वृक्षांची कटाई केल्यानंतर रात्रीला त्याची दोन ट्रॅक्टरमधून वाहतूक करण्यात येत होती. रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या जवाहरनगर पोलिसांनी पकडून भंडारा वनविभागाच्या सुपूर्द केले. या कारवाईने अवैध वृक्षतोड व त्याची वाहतूक करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.शहापूर येथील बाजारटोली परिसरातील नेहरु वॉर्ड निवासी कैलास मुरली सेलोकर यांच्या मालकीच्या दोन ट्रॅक्टरमधून ही वाहतूक करण्यात येत होती. साहुली परिसरातून वृक्षतोड केलेल्या लाकडांची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली.साहुली येथून वृक्षतोड केलेल्या लाकडांची वाहतूक सेलोकर हे त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून करीत होते. गुरुवारला रात्री ८ वाजताच्या सुमारास जवाहरनगरचे पोलीस उपनिरीक्षक ताराम हे आपल्या सहकाºयांसह रात्रगस्तीवर होते. साहूली ते जवाहरनगर दरम्यान ट्रॅक्टरमध्ये लादून आणित असलेल्या लाकडांबाबद ट्रॅक्टरचालकाला माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे सदर लाकडांची अवैधरित्या वाहतूक करित असल्याचे लक्षात आल्याने पोलीस उपनिरीक्षक ताराम यांनी भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.घटनेचे गांभीर्य ओळखून निलय भोगे हे वनरक्षक एस. एम. रामटेके वनमजुर रंजित हलदार, चालक अनिल शेळके यांच्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी ट्रॅक्टर चालकांना लाकडांची माहिती विचारल्यावर त्यांनी साहूली येथील एका खासगी गटातील वृक्षांची कटाई करुन सेलोकर यांच्या घरी नेत असल्याचे सांगितले.मात्र वृक्ष कटाईची किंवा कटाई केलेल्या लाकडाची वाहतूक परवानगीबाबद विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.घटनास्थळावर ट्रॅक्टर व त्यातील लाकडांचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करुन आणण्यात आले. दरम्यान सेलोकर यांनी वनाधिकाºयांना या वृक्षतोडीचा परवाना असल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांना परवान्याची मागणी केली असता ते देण्यास असमर्थ ठरल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे.बिना क्रमांकाची ट्रॅक्टर-ट्रॉलीलाकडांच्या वाहतूक प्रकरणी वनविभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरपैकी एका ट्रॅक्टर व त्याच्या ट्रॉलीला नंबरच नाही तर दुसºया ट्रॅक्टरचा नंबर नसून केवळ ट्रॉलीचा (एमएच ३६ जी २५६२) नंबर असल्याचा गंभीर प्रकार या कारवाई दरम्यान उघडकीस आला आहे. यावरुन अवैधरित्या वाहतूकीचे काम करण्याकरिता ट्रॅक्टरमालकाकरिता अशाप्रकारचा ‘बिना नंबरचा फंडा’ वापरण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.ट्रॅक्टरला माल वाहतुकीची परवानगी?उपप्रादेशिक परिवहन विभागातून वाहन चालविण्याची परवानगी व वाहनाला नंबर मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविता येते. कारवाईत पकडलेल्या ट्रॅक्टरला नंबर नसल्याने वाहतूकीचा परवाना मिळाला काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. दरम्यान दोन्ही ट्रॅक्टरला मालवाहतुकीचा परवाना आहे किंवा कृषी प्रयोजनाकरिता परवाना दिला याबाबत संदिग्ध भुमिका निर्माण झाली आहे.दोन ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरुन नेत असल्याची माहिती प्राप्त झाली. घटनास्थळावर ट्रॅक्टर चालक व मालकाला वृक्षांच्या कटाई व वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांनी पंचनाम्यादरम्यान तो दाखविला नाही. या ट्रॅक्टरमुळे साडेसात बीट कटाई केलेले लाकडे आढळून आले. सध्या दोन्ही ट्रॅक्टर जप्त करुन वनविभागात जमा केले आहे.- निलय भोगेवनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा