मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरी येथील मॉईल खाण परिसरात कंत्राटदारानेतीन ठिकाणी ७०० ते ८०० ब्रास अवैध रेती साठा ‘डम्प’ करून ठेवला आहे. परिसरातील बावनथडी नदीपात्रातील रेतीघाट बंद आहेत. नदी पात्रातून सध्या रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. खाणीत विना रॉयल्टीने रेती कशी खरेदी केली? हा असा प्रश्न उपस्थित होत आहे.केंद्र शासनाच्या नियंत्रणातील जगप्रसिद्ध मॅग्नीज खाण तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. येथे आहे. बाळापूर खाण म्हणून तिची ओळख आहे. खाणीत प्रवेशद्वारासमोर विश्रामगृह आहे. विश्रामगृहासमोर सिमेंट रस्ता बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेती साठा जमा करण्यात आला आहे. मॉईल कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर दुसरा रेतीचा डम्प आहे. मॉईल बाहेरून डोंगरी गावाकडे जाणाºया रस्त्याशेजारी तिसरा रेती साठा आहे. तीन रेती साठ्यातसुमारे ७०० ते ८०० ब्रास रेती आहे. एका कंत्राटदाराचा हा रेती साठा असल्याची माहिती आहे.चार दिवसापूर्वी या रेतीसाठ्याची पाहणी व चौकशी करण्याकरिता तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे व नायब तसीलदार एन.पी. गौंड गेले होते. पाहणी व चौकशीनंतर कारवाई अद्यापपावेतो झाली नाही. केंद्र शासनाच्या खाणीच्या आवारात तथा बाहेर रस्त्याशेजारी इतक्या मोठ्या प्रमाणात राजरोसपणे रेती साठा कसा केला जाऊ शकतो हा संशोधनाचा विषय आहे.चार दिवसापूर्वी डोंगरी बु. खाण तथा परिसरातील रेती साठ्याची पाहणी व चौकशी करण्यात आली. खाण प्रशासन व कंत्राटदाराला याबाबत पत्र देण्यात येणार आहे. रेती साठ्याची मोजणी करून महसूल नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर
मॉईलच्या खाणीत रेतीचा अवैध साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 10:49 PM
डोंगरी येथील मॉईल खाण परिसरात कंत्राटदारानेतीन ठिकाणी ७०० ते ८०० ब्रास अवैध रेती साठा ‘डम्प’ करून ठेवला आहे.
ठळक मुद्देडोंगरी येथील प्रकार : तहसीलदार म्हणतात कंत्राटदार, खाण प्रशासनाला पत्र देणार