शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:31 PM

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे वृक्ष नामशेष होत आहे.

ठळक मुद्दे कातुर्ली येथील प्रकार : वनक्षेत्राधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, जप्तीचे लाकडे वाऱ्यावर

प्रकाश हातेल।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे वृक्ष नामशेष होत आहे. वनविभागाला याचा लाखोंचा फटका बसत आहे.पवनी तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगल व्याप्त आहे. तालुक्यात पवनी वनक्षेत्र १६ हजार ३८४ हेक्टर असून अड्याळ, सावरला, नेरला, भुयार, खापरी, केसलवाडा, तिर्री आदी परिसर जंगलव्याप्त आहे. तालुक्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. खरीप हंगामानंतर काहीही काम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील काहीची नजर जंगलातील वृक्षाकडे गेली. जंगलातील मौल्यवान सागवनाची झाडे तोडून त्यांची चिराण करून लाखो रूपयाला विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यात काही वनअधिकाºयाचा मुख्य परवाना असल्याचे सुत्रानी सांगितले. याशिवाय रॉकेल व गॅसच्या किंमती वाढल्याने स्वयंपाकासाठी सरपण आणण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जंगलात जात असून सरपणाच्या नावावर सागवनाची झाडे तोडली जात आहेत.अड्याळ वनक्षेत्रात तिर्री, कलेवाडा, नेरला, येटेवाही येथे दाट जंगल असून हा परिसर उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागून आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असतो. जवळच्या कातुर्ली येथील समाज मंदिरासमोर सागवान, आंबा, बोर, अंजन, कीन आदी वृक्ष कापून रचून ठेवण्यात आले आहेत. वास्तविकता शेतातील झाड कापल्यानंतर ते विना परवानगीने इतरत्र हलविता येत नाही. परंतु ही सर्व लाकडे विना परवानगीने हलविण्यात आली आहेत. यामध्ये वनअधिकारी व कंत्राटदाराचा संगणमत असतो. घटना स्थळाला वनक्षेत्राधिकाºयांनी भेट देवून तोडलेली लाकडे जप्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जप्ती केलेली लाकडे खुल्या मैदानात पडलेल्या स्थितीत असून चोरीला जाण्याचा प्रकार होत आहे. या लाकडांची योग्य विल्हेवाट लावून कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परिसरात बाभुळ वृक्षाच्या नवाखाली शेत शिवारातील आडजात वृक्षांचीही विना परवाना कंत्राटदार ट्रक, ट्रॅक्टरने, भंडारा, नागपूर, नागभिड येथे अवैध लाकडाची तस्करी करीत आहेत. पहाटे घराबाहेर पडून महिला व पुरूष सरपणाच्या नावाखाली महिला झाडाची कत्तल करून मोळ्या आणतात. पुरूष सागवणाची शेती उपयोगी अवजारासाठी परिसरात पहाटे ५ ते ६ वाजताच्या सुमारास सायकलवर विक्री करताना आढळतात. जंगलातील झाडे कापून ते शेतातील झाडांमध्ये मिसळविण्याचा गोरखधंदा भंडारा विभागात अनेक वर्षापासून सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.