शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

हॉटेल, चहा टपऱ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा बिनधास्त वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 1:50 PM

Bhandara : दरवाढीचा परिणाम : गैरप्रकारावर संबंधित यंत्रणांनी करावी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरासोबत ग्रामीण भागातही हॉटेल, चहा टपऱ्या, रेस्टॉरंट आदी ठिकाणी तसेच वाहनांत सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहेत. विशेष म्हणजे रहदारीच्या ठिकाणी उघड्यावर सिलिंडर वापरले जात आहेत. त्यामुळे अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेकडून कारवाई होण्याची गरज आहे. परंतु, धाडसी कारवाया होत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.

भंडारा शहरातील मोठा बाजार, महामार्ग परिसर, बसस्थानकासमोरील परिसरात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करतात. गॅस वापरताना त्यांच्याकडून फारसी सुरक्षितता बाळगली जात नाही. त्यामुळे धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही वाहनांमध्येही अनधिकृतपणे सिलिंडर वापरले जाते. अनधिकृत सिलिंडर विक्रीही केली जात आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी शासनाच्यावतीने सवलती दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी असतात. त्याचाच गैरफायदा व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. पुरवठा विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु, कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे. व्यावसायिक खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत.

गॅस सिलिंडरचा गैरप्रकार कुणाकडून?

• व्यावसायिकांकडून अधिक नफा कमावण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे. वितरक, ग्राहक आणि डिलिव्हरी करणारे कर्मचारी या माध्यमातून गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण थेट वितरकांशी संपर्क करून तर काही जणांकडे कुटुंबातील सदस्यांच्या नावे दोन ते तीन कनेक्शन असल्याने त्यांच्याकडून खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गॅस सिलिंडरचे सध्याचे दर असेसिलिंडर वजन (किलोग्रॅम)            दर घरगुती १४.२                                     ८६३व्यावसायिक १९                                 १९५४फ्लेम प्लस १९                                    १९७४

ग्राहकांना वर्षभरात किती सिलिंडर?• एका कुटुंबाला किंवा एका कनेक्शनधारकास एका वर्षासाठी १२ सिलिंडर दिले जातात. यापेक्षा अधिक सिलिंडरची आवश्यकता असेल तर आणखी ३ सिलिंडर, असे १५ गॅस सिलिंडर दिले जाऊ शकतात. मात्र, त्या तीन सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी ही प्रणाली अस्तित्वात आहे.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरInflationमहागाईhotelहॉटेलbhandara-acभंडारा