शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

बावनथडीग्रस्तांना तत्काळ मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:49 AM

बावनथडी प्रकल्पग्रस्त ८५२ शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेष मेळावे आयोजित करून मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्दे८५२ शेतकरी : तुमसर येथील आढावा बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बावनथडी प्रकल्पग्रस्त ८५२ शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेष मेळावे आयोजित करून मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तुमसर येथे उपविभागीय आढावा बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी सुभाष चौधरी, तहसीलदार गजेंद्र बालपांडे उपस्थित होते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची बावनथडी प्रकल्पात जमीन गेली आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. ही बाब या बैठकीत आमदार चरण वाघमारे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी बावनथडी प्रकल्पातील ८५२ शेतकºयांना तात्काळ मोबदला वाटप करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना दिले. यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.बेटेकर बोथली प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनस्तरावरून तात्काळ मंजुरीप्राप्त होणार आहे. तसेच सोरणा प्रकल्प वनविभागाकडून जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी निधी सुपूर्त केला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. टंचाई व सिंचनाच्या कामात प्राधान्य देण्यात यावे असे सांगत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सिंचन प्रकल्पातील कालव्यात साचलेला गाळ व कचरा प्राधान्याने काढण्यात यावा.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत खैरलांजी व पालोरा येथे आठ व दोन मेगावॅटचे उपकेंद्रासाठी जमीन प्राप्त झाली असून वीज निर्मिती झाल्यावर यावर तीन हजार सौर कृषीपंप कार्यान्वित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी वीज पोहचू शकत नाही तेथे सौर कृषीपंप देण्याची योजना असून त्यासाठी पाच व तीन एपीचा डिसी पंप देण्यात येतो. याची मुळ किंमत ३ लाख ८५ हजार व २ लाख ५५ हजार आहे. मात्र शासन सबसिडीवर हे पंप अनुक्रमे ३८ हजार ५०० व २५ हजार ५०० रुपयात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर, मोहाडी तालुक्यातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. या बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. पाणीटंचाई, जलसंधारण व सिंचन, पांदन रस्ते योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते, सौर कृषीपंप, कर्जमाफी, पीक कर्ज वाटप, विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अन्न सुरक्षा योजना व ग्रामरक्षक दल आदींचा आढावा घेतला.वर्ग एकचा ६९ हजार खातेदारांना फायदाभोगवटादार वर्ग दोन मधून भोगवटादार वर्ग एक मध्ये समावेश करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ तुमसर व मोहाडी येथील ६९ हजार खातेदारांना मिळणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व सातबारा वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे.सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत शहरीभागात राहणाºया नागरिकांजवळ तीन वर्षांची घरटॅक्स पावती असल्यास त्यांच्याकडून इतर पुरावे मागण्यात येऊ नये असे निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प