निराजकुमार बडोले : गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार
गोंदिया : गोंदियासारख्या मागास जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना आहेत. योजना राबविताना योग्य त्या लाभार्थ्याची निवड करून विकासात्मक कामे गुणवत्तापूर्ण असावित. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. शनिवार (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिह्याच्या विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गायकवाडा प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून निधी देण्यात येते. निधी ज्या बाबींवर खर्च करावयाचा आहे, तो वेळीच पूर्ण करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. नियोजन केले तर अखर्चित किंवा समर्पित करण्याची वेळच येत नाही. संबंधित विभागाने तांत्रिक मंजुरी निर्धारित वेळेत घेण्यासाठी त्यांच्या मुख्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे ते म्हणाले.जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मिती याकडे विशेष लक्ष या कार्यक्रमात देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना शाळा ते गाव अशी प्रवासासाठी एसटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या भागात मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने एसटी बसेसची आवश्यकता आहे, त्या भागात एसटी बसेस सुरू कराव्या, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे व मुतारीची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील ज्या शाळांना संगणक पुरवठा करण्यात आला आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी संगणकाचा नियमित वापर करावा, असेही ते म्हणाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविण्याा येतात, असे सांगूण पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, घरकूल योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधवांना कसा देता येईल, याचे नियोजन करावे. या वेळी त्यांनी विविध विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)