लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवोदय विद्यालयाच्या प्रश्नावर पालकांसह आंदोलकांनी मंगळवारी पुकारलेल्या शाळा व महाविद्यालय बंदला शहरातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बालकांच्या शैक्षणिक प्रश्न नसून त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यावर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही, अशी कणखर भूमिकाही आज उपोषणमंडपात व्यक्त करण्यात आली.या उपोषणाला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी बलबीर तथा अन्य एका अधिकाऱ्यांनी भेट देऊन समस्येची गाथा ऐकली. यासंदर्भात जकातदार शाळेतून सदर वसतिगृह एक वर्षाकरीता नवोदय विद्यालयास देण्यास अल्पसंख्यांक विभागाने मान्यता प्रदान केली असून शिफ्टींगची कामे सुरू आहेत. तसेच अल्पसंख्यांक विभागाची पूर्ण इमारत ताब्यात देण्यात यावी, जेणेकरून विद्यालय प्रशासनाला प्रलंबित असलेला निकाल लावता येईल, अशी मागणी करण्यात आली. यावर अजुनपर्यंत तोडगा निघालेला नाही.प्रशासन विद्यार्थी व पालकांच्या बाजूनेभंडारा : नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून नवोदय विद्यालयाच्या इमारती संदर्भाने तसेच नवोदय भंडारा येथे स्थापित राहणे संबंधाने प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून विद्यार्थी व पालकांना सर्व सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाची आहे. पालकांनी व विद्यार्थ्यांनी याबाबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जकातदार विद्यालय भंडारा येथे सुरु असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाची इमारत अयोग्य असल्याचे व्हिएनआयटी नागपूर या संस्थेने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नवोदय विद्यालयात शिकत असलेल्या ३६ विद्यार्थ्यांकरीता पर्यायी निवासी शाळा उपलब्ध करुन देण्याबाबत प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांनी विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागाकडे संभाव्य इमारतीचा शोध घेण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच पूणे येथील एक चमू भंडारा येथे यासाठी जिल्ह्यात दाखल होणार आहे.बाळासाहेबांची उपोषण मंडपाला भेटविशेष म्हणजे या उपोषणाला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देवून जाहीर पाठींबा दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करू असे ठोस आश्वासन दिले. तत्पूर्वी बाळासाहेबांनी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत पक्षाच्या विविध भूमिकेबाबत मत प्रकट केले. बाळासाहेब म्हणाले की, समाजातील वंचित घटकांना एकत्रित करून येणाºया विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊन जायचे आहे. निवडणुकीत ५० जागांवर भारिप बहुजन महासंघ उमेदवार उभे करणार असून मुख्यमंत्री हा भारिप बहुजन महासंघाचाच असेल, असेही त्यांनी ठासून सांगितले. धनगर, मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, वंचितांनाही सामाजिक, आर्थिक आरक्षण मिळणे नितांत गरजेचे आहे. संविधानाच्या प्रती जाळणाºया घटनेचा आम्ही निषेध करीत असून जातीय दंगे घडविण्याचा हा यामागे हेतू आहे, असेही बाळासाहेब म्हणाले.
महाविद्यालय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:17 PM
नवोदय विद्यालयाच्या प्रश्नावर पालकांसह आंदोलकांनी मंगळवारी पुकारलेल्या शाळा व महाविद्यालय बंदला शहरातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बालकांच्या शैक्षणिक प्रश्न नसून त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यावर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही, अशी कणखर भूमिकाही आज उपोषणमंडपात व्यक्त करण्यात आली.
ठळक मुद्देनवोदय विद्यालयाचे प्रकरण : पुणे येथून येणार केंद्रीय चमू, शिफ्टींगची कामे सुरू