भंडारा : मंडईच्यानिमित्ताने गुरूवारला भंडारा शहलगतच्या टवेपार येथे देशी मातीतील कुस्ती खेळाचा रोमहर्षक डाव रंगला. राज्यातील नामवंत पहेलवानांनी विविध डावपेचांचे प्रदर्शन करीत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आयोजन समितीचे वतीने यशस्वी पहेलवानांवर रोख रक्कम तसेच वस्तुंच्या स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव झाला. आखाड्यातील डावपेच 'याची देही, याची डोळा' पाहण्यासाठी पंचक्रोशितील नागरिकांची उपस्थिती होती.
भगीरथा भाष्कर हायस्कूल टवेपार येथे आमदंगलीचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. आमदंगलीचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार दादा कोचे यांनी केले. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर होेते. प्रमुख अतिथींमध्ये नरेश झलके, मुख्याध्यापक युवराज रामटेके, माजी सभापती नंदू झंझाड, पत्रकार युवराज गोमासे, देवानंद नंदेश्वर, विलास लिचडे, सरपंच सुरेश झलके, वाल्मीक कडव, सागर कातोरे, पूजा ठवकर, सुधीर सार्वे, दिलीप बाभरे, माजी जि. प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, संगिता ठवकर, गणेश तिजारे, सरपंच रिना गजभिये, प्रभूजी मते, श्रीकांत मते, शिक्षक रामटेके, बांडेबुचे, मंडळाचे अध्यक्ष सुधीर कढव, अजय लुटे, राजेश तिजारे, मुकेश ठवकर, राहूल कुंभारे व मंडळाचे सदस्य व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पंच म्हणून अशोक बंसोड, चरण निंबार्ते, मदन पहेलवान यांची उत्तरित्या कामकाज पाहिले. दुपारी ३ वाजतापासून सुरू झालेली आमदंगल सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू होती. उपस्थित मान्यवरांचे हस्ते विजयी पहेलवानांना भरघोष बक्षिसांचे तसेच रोख रक्कमेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व अभार गोपाल सेलोकर यांनी मानले. कुस्त्यांची आमदंगल पाहण्यासाठी भंडारा शहरासह, खोकरला, बिड, कोथुर्ना, भोजापूर, दाभा, सिरसोली, वरठी, टवेपार व अन्य गावातील नागरिकांची उपस्थित होती.
राज्यातील पहेलवानांचा सहभागआमदंगलीला कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, जबलपूर, बालाघाट, हाजीनगर, अमरावती, नागपूर, अंजनगाव सुर्जी, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील रोहा, सुकळी, मांढळ, टवेपार, भोसा-टाकळी, भूगाव, मेंढा व अन्य गावातील पहेलवानांनी उपस्थिती दर्शवित आखाड्यात विविध डावपेचांचे प्रदर्शन केले.