लाखांदूर :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करुन भावी काळात देशात शास्त्रज्ञ निर्माण करण्या हेतू केंद्र शासनाने नीती आयोग अंतर्गत विविध शाळेत अटल टिंकरिंग लॅब दिल्या असून ह्या लॅबचे नुकतेच उद्घाटन येथील शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले.
यावेळी दिलीप दिवठे , नितीन वाघमारे, वामनराव बेदरे, अखिलेश कुमार, शेषराव आरीकर , चित्ररेखा ठाकरे, चंद्रकांत दिवठे, मुख्याध्यापक एस. डी. राऊत, लक्ष्मण बगमारे, देविदास राऊत, एम एन ढोरे, एम व्ही लोथे, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के.मेश्राम यांनी केले तर संचालन जे.टी.झोडे व आभार एम.के.ढोरे यांनी मानले.यावेळी बहुसंख्य शालेय विद्यार्थी, पदाधिकारी, कर्मचारी व पालक, नागरिक उपस्थित होते.