लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सुमारे ५० वर्ष राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता खराब होणार नाही. अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. परंतु तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाच्या तुडका शिवारातील सिमेंट रस्त्याला उद्घाटनापूर्वीच तडे गेले आहे. भर उन्हाळ्यात येथील सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता. पुरेसे पाणी न घातल्याने रस्त्याला तडे गेल्याचे बोलले जात आहे.मनसर- रामटेक - तुमसर - गोंदिया असा राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण सिमेंट रस्ता बांधकामाला जोरात सुरुवात करण्यात आली. प्रथम जूना रस्ता खोदून त्यात माती व मुरुमाचा भराव करण्यात आला. मुरुमाअभावी तुडका- मांगली शिवारात लाल मुरुम मिश्रीत मातीचा भराव करण्यात आला.भर उन्हाळ्यात सदर शिवारात सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे कामे करण्यात आली. पुरेसा पाणी तेव्हा उपलब्ध नव्हता. सिमेंट रस्त्यावर पोत्यांचे कापउी कव्हर संपूर्ण रस्त्यावर घालून त्यावर कंत्राटदाराने पाणी घातले होते.संपूर्ण सिमेंट रस्ता अशाच प्रकारे पाण्याने ओला करण्याचा देखावा येथे करण्यात आला होता.तुडका शिवारात महर्षी शाळेजवळ सिमेंट रस्त्याला पूर्ण आडवे तडे गेले आहे. तडे गेल्याने रस्ता बांधकामाची गुणवत्तेवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोवीस तास जड वाहतुकीचा महामार्गाला उद्घाटनापूर्वीच तडे गेल्याने संपूर्ण रस्त्याचा दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे.ये-जा करणाऱ्यांचे लक्ष सध्या तडे गेलेल्या रस्ता लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग सिमेंट रस्ता बांधकामाची सुमारे ५० वर्षे व त्यापुढे रस्त्याची गॅरंटी दिली होती.राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा मोठा स्टाफ कार्यरत आहे. परंतु त्यांचे रस्ते बांधकामाकडे दुर्लक्ष दिसत आहे. रस्ता भरावापासून तर सिमेंट काँक्रीटचे कामे पूर्ण होईपर्यंत जबाबदार अधिकारी इकडे थिरकले नाही. अशा अनेक तक्रारी गाव शिवारातील ग्रामस्थांनी केल्या होत्या. त्याकडे कायम महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.दुरुस्तीकरिता धडपडमुख्य सिमेंट रस्त्यावर तडे पडल्याने ते दुरुस्ती करुन तांत्रीक ठरलेले उत्तर महामार्ग प्राधीकरण देऊन मोकळे होणार आहे. अनेक तांत्रिक कारणे त्यांच्याकडे ठरलेली आहेत. केंद्राच्या विषय असल्याने स्थानिकांचा आवाज तिथपर्यंत पोहचत नाही, परंतु येथ ेधोक्याची शक्यता बळावली आहे. सदर रस्त्याला तडे गेल्याचे प्रथम स्टेशनटोलीचे माजी सरपंच श्याम नागपुरे यांनी लोकमतकडे मांडली.पालकमंत्र्यांनी पाहणी करावीसोमवारी भंडाराचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री क्षेत्र परसावाडा (दे) येथे एका कार्यक्रमाला येत आहेत. कार्यक्रम स्थळपासून केवळ दोन मिमी अंतरावर तुडका शिवार आहे. तडे गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी ना. फुके यांनी करण्याची गरज आहे. रस्ते विकासाचे सशक्त माध्यम असून कोट्यवधींचा हा राष्ट्रीय महामार्ग सध्या तयार होत आहे. रस्ता कामात अनियमितता आहे काय? याची चौकशीची मागणी काँगे्रसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.
उद्घाटनापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:49 AM
सुमारे ५० वर्ष राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता खराब होणार नाही. अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. परंतु तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाच्या तुडका शिवारातील सिमेंट रस्त्याला उद्घाटनापूर्वीच तडे गेले आहे.
ठळक मुद्देतुडका शिवारातील प्रकार : रस्त्याच्या दर्जाबाबत शंका, गुणवत्तेची चौकशी होईल काय?