लाखनी : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नातून रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदीला प्रारंभ झाला आहे.
खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाली आहेत. रब्बी धानाची साठवणूक कोठे करायची, याच प्रश्नावरून पिंपळगाव/सडक येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या संचालक मंडळाचा जागेचा ताबा सुटत नव्हता. यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या प्रयत्नाने एका खासगी गोदामाची उपलब्धता झाल्याने पिंपळगाव /सडक येथील आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन डी. एम. ओ. गणेश खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, गणेश खर्चे, धान खरेदी केंद्राचे अध्यक्ष अविनाश कमाने, बाळा शिवणकर, रेंगेपारचे सरपंच मनोहर बोरकर, संजू दोनोडे, सुरेश मते, शामराव मडावी, प्रदीप मेश्राम, केंद्राचे ग्रेजर दीपक बुराडे, आनंद दोनोडे, श्रीकृष्ण कमाने, आदी मान्यवर उपस्थित होते.