या केंद्रांतर्गत तालुक्यातील गोरगरीब जनतेला दुपारी ११ ते ३ या कालावधीत भोजन उपलब्ध केले जाणार आहे. सद्यस्थितीत या भोजनालयाअंतर्गत कमाल १०० थाळ्या भोजन उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती असून, सदरचे केंद्र नियमित सुरू असणार आहे. सध्या या केंद्राअंतर्गत शासन निर्देशानुसार मोफत भोजन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन लाखांदुरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सदर संस्थेच्या अध्यक्षा सरिता सुनील फुंडे, कल्पना जाधव, गीता लंजे, सुनीता बिसेन, नीषा बगमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालु चुन्ने, शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, मिलिंद डोंगरे, देविदास राऊत, देवानंद नागदेवे, सुभाष दिवठे, संजय नहाले, रेशिम परशुरामकर, मंगेश ब्राम्हणकर, रजनिकांत खंडारे, मानबिंदु दहिवले, सुरज मेंढे, डॉ. खुशाल मोहरकर यांसह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
250521\img-20210525-wa0043.jpg
===Caption===
लाखांदुर येथील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करतांना संस्थेच्या अध्यक्षा सरिता सुनिल फुंडे