तुमसर : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब उपाशीपोटी राहू नयेत म्हणून राज्य शासनाने शिवभोजन केंद्राचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार शहरातील लुम्बिनी महिला बचत गटाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या मोफत शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन माजी खासदार मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव
धनंजय दलाल, सुनाल फुंडे, अमरनाथ रगडे, अभिषेक कारेमोरे, सुधाकर कारेमोरे, प्रमोद तितिरमारे, रंजिता कारेमोरे, सरिता मदनकर, राजू माटे, के. के पंचबुधे, देवचंद ठाकरे, शंकर राऊत, गीता कोंडेवार, नेहा शेंडे, कल्पना नवखरे, वॄंदा गायधने, प्रदीप कुमार भुरे, सरोज भुरे, यासिन छवारे, नानू परमार, जाकीर तुरक, सलाम तुरक, तिलक गजभिये, राजेश देशमुख, पमा ठाकूर, प्रेरणा तुरकर, उमेश तुरकर,तसेच लुम्बिनी महिला बचत गट सदस्या वंदना आकरे , विजया चोपकर, कविता साखरवाडे, मीना गाढवे, मधुमती साखरवाडे, उमा साखरवाडे, करुणा धुर्वे, सुरेखा सहारे, वनिता मलेवार, वंदना मलेवार, नूतन भोले, लता मालाधरे, आरती चकोले, मिर्जा बेग , शैलेश साखरवाडे, प्रदीप भरणेकर, सुनील थोटे, गोवर्धन किरपाने, संदीप पेठे, शालिनी पेठे, निशिकांत पेठे, राकेश धार्मिक, नंदा डोरले, जयश्री गभणे, विजय गिरीपुंजे, विनोद मानापुरे, खेमू गभणे, वसिम कुरैशी, रिंकू ठाकूर, धनराज मेश्राम, रुद्र समरीत, मुकेश मलेवार, मनोज वासनिक, सीमा बडवाईक, श्वेता काहालकर, दादू चोपकर, संकेत गजभिये , प्रवीण भुरे , अपेक्षा राणे व इतर मंडळी उपस्थिती होते . संचालन व आभार लुम्बिनी महिला बचत गटाच्या संचालिका सरोज भुरे यांनी मानले.