हे नवीन शिवभोजन केंद्र परिसरात लाखांदूर रोड येथे न्यायालय, डाकघर, उपविभागीय कृषी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, उपजिल्हा रूग्णालय, धान्याचे शासकीय गोदाम व विशेष म्हणजे येथे लाखांदूर, अर्जूनी/मोर, नवेगावबांध, वडसा, चंद्रपूर - गडचिरोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मुख्य बसथांबा ठिकाण आहे हे विशेष. शिवभोजन केंद्र शुभारंभप्रसंगी अध्यक्ष नरेश डहारे, उदघाटक म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव, सुनील लांजेवार, राजू पटले, लोकेश यादव, प्रमोद मेश्राम, अजय राठोड, श्रीकांत पंचबुद्धे, लवकुश निर्वाण, बाळा बोरकर, अनिल गायधने, किशोर चन्ने, विलास मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मंगेश गोडांगे, अरूण चन्ने, जगदीश मनगटे, विठोबा बोरकर, मंगेश वैद्य मवासे उपाध्यक्ष, हजारे गुरूजी, बळीराम बोरकर व शिवभोजन केंद्रातील पुष्पा राऊत, रंजना शहारे, भूमिता उजगावकर यांचे सहकार्य लाभत आहेत.
साकोली येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:41 AM