लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याच्या दक्षिणपूर्व भाग हा चौरास पट्टा म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात बहुतांश शेतकरी दोन्ही हंगामात धानाचे पीक घेतात. परंतु धान शेतीला पुरक व्यवसाय म्हणून फळबागाची लागवड केली. त्यातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत केला जातो. लाखनी तालुक्यातील कोलारी येथील मोरेश्वर सिंगनजुडे या शेतकºयाने केळीच्या बागेतून सात लाखांचे उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.गत वर्षांपासून धान पिकावर अस्मानी व सुलतानी संकटाचा मार बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकºयाला बसत आहे. यावर पर्यायी व पुरक व्यवसाय म्हणून फळ उत्पादनाच्या माध्यमातून मदत होऊ शकते, या विचाराने प्रेरीत होऊन कोलारी येथील मोरेश्वर सिंगनजुडे या शेतकºयाने शेतात पपईसह केळीचे उत्पादन घेतले. केळीची फळबाग लावली. धान शेतीत प्रती एकरमागे २० ते २५ हजार रुपये खर्च येत होता. त्यातून ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळायचे. त्यामुळे धान शेती डोईजड वाटत होती. धानासह पुरक व्यवसाय शोधण्यासाठी जिल्ह्यातील अन्य बागायतदारांच्या संपर्कात येवून मोरेश्वरने याबाबत माहिती जाणून घेतली.प्रथम प्रायोगिक तत्वावर दोन वर्षांपुर्वी दोन एकर शेतीमध्ये पपईची तायवान ७८६ या प्रजातीची लागवड केली. कृषी सहायक सपाटे व वडेगाव येथील दिलीप कुथे यांनी तांत्रिक व योजनेबाबत मार्गदर्शन केले. लागवडीसाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र त्यातून साडे तीन लाख रुपयांचा लाभ झाला. त्यामुळे धान पीकाऐवजी संपूर्ण शेतातच फळबागाची लागवड केली. आंबे, चिकू या इतर फळझाडांचीही लागवड केली. फळबागांच्या शेतीतून आर्थिक उत्पन्न घेणारे मोरेश्वर सिंगनजुडे हे एक आदर्श शेतकरी ठरले आहे.भंडारा व चंद्रपूर हे एक उत्तम बाजारपेठही लाभली आहे. परंतु साहित्य ने-आण करण्यासाठी भाडे जास्त द्यावे लागत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ठिंबक सिंचन योजना तसेच आंतरपिकाबाबत व खतांच्या वापराबाबतही त्यांनी योग्य नियोजन केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांना या बागेतील उत्पन्नाचा मोठा आधार मिळाला.झाडे झाली उत्पादनक्षमगत वर्षी सिंगनजुडे यांनी ११०० झाडांची लागवड केली. ही झाडे उत्पादन क्षम झाली आहे. यावर्षी पूर्व मशागत करुन पपईची एक हजार झाडांची लागवड सुरु आहे. यासाठी शासनाकडून अनुदान मिळाले आहे. पपई व केळी लागवडीच्या माध्यमातून साडे सहा एकरात सात लाखांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.
धान पट्ट्यात केळीच्या बागेतून सात लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:00 AM
गत वर्षांपासून धान पिकावर अस्मानी व सुलतानी संकटाचा मार बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकºयाला बसत आहे. यावर पर्यायी व पुरक व्यवसाय म्हणून फळ उत्पादनाच्या माध्यमातून मदत होऊ शकते, या विचाराने प्रेरीत होऊन कोलारी येथील मोरेश्वर सिंगनजुडे या शेतकºयाने शेतात पपईसह केळीचे उत्पादन घेतले. केळीची फळबाग लावली. धान शेतीत प्रती एकरमागे २० ते २५ हजार रुपये खर्च येत होता.
ठळक मुद्देकोलारीचा शेतकरी : चौरास परिसरातील शेतकऱ्यांपुढे निर्माण केला आदर्श