दारूच्या नशेत दारूच्या दुकानात गेला होता चौकशीलासाकोली : येथील एका दुकानाचा तोतया इन्कम टॅक्स आॅफीसरला अटक करण्यात आली आहे. मोहनलाल मुन्नालाल बिसेन रा.गोंडउमरी असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.पोलीस सुत्रानुसार, फिर्यादी दीपक थानथराटे यांचे साकोली येथील बाजारवाडीत परवानाप्राप्त देशी दारुचे दुकान आहे. रोजप्रमाणे थानथराटे यांनी आपले दुकान उघडले असता मोहनलाल बिसेन हा इसम दुकानात आला व थानथराटे यांना इन्कम टॅक्स आॅफीसर असून मला तुमच्या दारु दुकानाचे रेकार्ड दाखवा ते तपासायचे आहे, असे म्हणाला. यावर थानथराटे यांनी सदर इसमाला आपण इन्कम टॅक्स आॅफीसर आहात तर तुमचे ओळखपत्र दाखवा, अशी मागणी केली असता त्याने ओळखपत्र दाखवत नाही. अशी अरेरावीने बोलत तुम्ही दारू दुकान कसे चालविता ते पाहून घेईन, अशी धमकी दिली. त्यानंतर थानथराटे यांनी बिसेन यांना पकडून ठेवले व या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन तोतया इंकमटॅक्स आॅफीसरला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकिय तपासणी केली असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सदर व्यक्ती दारु पिऊन असल्याचा अहवाल दिला. यावरुन पोलिसांनी बिसेन यांच्याविरूद्ध भादंवि १७० ५११, ५०६ सहकलम ८५ (१) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तपास साकोलीचे पोलीस हवालदार बागडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत तोतया आयकर अधिकाऱ्याला अटक
By admin | Published: January 21, 2017 12:27 AM