लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये. अनुसूचित जातीला बौद्धधम्म स्विकारणाºयांना देखील अनुसूचित जातीच्या तरतुदी, संरक्षणे व सोयी सवलती लागू असाव्यात तसेच अनुसूचित जातीमधून धर्मांतरीत बौद्ध हा प्रवर्ग अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ठ करण्यात यावा.१९६२ पासून महाराष्ट्रात धर्मांतरीत बौद्धांना अ.जा. च्या सवलती मिळतात. परंतु ज्या प्रवर्गाला महाराष्ट्रात अ.जा. म्हणून आरक्षण आहे, त्यच बौद्धांना केंद्र सरकार आरक्षण देत नाही हा विरोधाभास आहे. १९९० च्या संविधान अ.जा.आदेश पारित केल्यानुसार अ.जा. च्या यादीमध्ये अ.जा. तून धर्मांतरीत बौद्ध हा प्रवर्ग समाविष्ट करणे आवश्यक होते. परंतु गेल्या २७ वर्षापासून हे झालेले नाही. त्यामुळे या प्रवर्गाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. असे मत संमेलनातील पहिल्या सत्रातील वक्ते माजी न्यायमुर्ती अनिल वैद्य यांनी व्यक्त केले.संमेलनातील दुसºया सत्रातील वक्ते डॉ. नितीन राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्धांची संख्या जवळपास १ कोटी आहे. हा बौद्ध समाज १९५६ पासून बौद्ध पद्धतीनुसार विवाह करतो हिंदू व बौद्ध धर्मियांच्या रूढी, परंपरा, श्रद्धतेत धार्मिक संस्कार, विधी, समारंभ, पद्धती भिन्न आहेत.१९७० च्या दशकात बौद्ध पद्धतीच्या विवाहाला न्यायालयाने बौद्ध विहार व वारस कायदा नसल्यामुळे बेकायदेशीर ठरविले होते. दुसºया न्यायालयाने बौद्ध पद्धतीनुसार होणारे विवाह कायदेशीर ठरविले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी या धर्मियांचे स्वतंत्र विवाह कायदे आहेत मग बौद्ध धर्मियांचा स्वतंत्र विवाह कायदा कां असू नये, मी आमदार असताना २००७ साली महाराष्ट्र विधानसभेत बौद्ध विहार व वारस हक्क कायदा शासनाने मान्यताही दिली होती. परंतु अजूनही तो पूर्णत्वास आला नाही म्हणून शासनाने हा कायदा लवकर मंजूर करावा.बौद्ध संस्कृती सवंर्धनाचा प्रश्न पवनी येथील उत्खननाच्या संदर्भात या विषयावर प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक व्याख्यान झाले. भारतात बौद्ध स्थळांच्या केलेल्या उत्खननातले अवशेष मिळाले आहेत. त्यापैकी काही अपवाद वगळता बहुतेक स्थळे ही अजुनही दुर्लक्षित आहेत.पवनी येथे १९६९-७०-७१ साली पुरातत्व विभागातर्फे केल्या गेले. त्यात मौर्यपूर्व ते शुभ सातवाहून काळातील तीन बौद्ध स्तुप उघडकीस आले. जवळपास पन्नास वर्षात या स्तुपावर व परिसरात अतिक्रमण झाले. भारतीय सर्वेक्षण व पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात, त्यावर कुंपण करावे व या स्थळांना भेटी देणाºयांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात तसेच उर्वरित दोन स्थळाचेही उत्खनन करून सत्य उघडकीस आणावे जेणे करून भूर्गभात गडप असलेल्या बौद्ध संस्कृती व अवशेषाची लोकांना माहिती होईल, असा आशावाद डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केला.
धर्मांतरित बौद्ध प्रवर्गाला अनुसूचित जातीत समाविष्ठ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:22 PM
अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये.
ठळक मुद्देचर्चासत्रातील सूर : राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन