संस्थेच्या गोदामाबाहेर उन्हाळी धान खरेदी केंद्राचे उद्घाटनप्रसंगी त्यांनी मागणी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर तलमले, सचिव सुनील कापसे, ग्रेडर प्रेमचंद अर्थात बालु खंडाईत, योगेश खंडाईत, देवराम तलमले संचालक मंडळात कोठीराम भुसारी, शालिक खंडाईत, हमाल, शेतकरी उपस्थित होते. ३१ मे ही ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख देण्यात आली आहे. संबंधित केंद्रांतर्गत शेतकऱ्यांनी ग्रेडरकडे नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. नोंदणी करताना सातबारा, आधारकार्ड, पासपोर्ट व अर्ज देण्यात यावा. असे सुचविण्यात आले.
ग्रेडर बालू खंडाईत यांनी शेतकऱ्यांना ओले धान खरेदी केंद्रावर आणू नये, असे सांगितले. धानाचा ओलावा १७ टक्क्यांपर्यंत असावा. त्यापेक्षा अधिक असू नये. नोंदणी झाल्यानंतर आपणास कोणत्या तारखेला मोजणी आहे याची माहिती सांगितली जाणार आहे. ३० जून ही धान खरेदी केंद्राची शेवटची तारीख असते. साधारणता १ मे ते ३० जून हा दोन महिन्यांचा कालावधी उन्हाळी धानाच्या हंगामात मोजणीकरिता पुरेसा आहे. परंतु मे महिना पूर्णत: रिकामाच गेल्याने उर्वरित जून महिन्यात धान वाढवावा, अशी मागणी केली आहे.