गत काही दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत होती. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आणि ॲक्टिव्ह रुग्णांत भर पडली. सध्या जिल्ह्यात १०६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ४१३, मोहाडी ७०, तुमसर ११६, पवनी ८५, लाखनी ९८, साकोली २०० आणि लाखांदूर तालुक्यातील ७९ रुग्णांचा समावेश आहे.
बॉक्स
मृत्यूसंख्या नियंत्रणात
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १०४६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. यातील निम्मे मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यातील आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून मृत्यूची संख्या कमी झाली आहे. १५ मेपासून मृत्यूचा आकडा कमी होत गेला. गत काही दिवसांपासून तर एक किंवा दोघांचाच मृत्यू होत आहे. २१ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यू नियंत्रणात असल्याने दिलासा मिळत आहे.
बॉक्स
बुधवारी ९४ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात बुधवारी ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार २३७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यात २३ हजार ६१४, मोहाडी १४४४, तुमसर ६८२६, पवनी ५७८१, लाखनी ६२६०, साकोली ६८६९, लाखांदूर २७४३ रुग्णांचा समावेश आहे.