आरोग्य विभागांतर्गत काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून सदर लसीकरणामुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या अफवांनी तालुक्यात जोर धरला आहेे असून मृत्यूच्या भीतीने नागरिकांची लसीकरणाला पाठ दाखविल्याने तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रचंड संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मागील काही महिन्यांपूर्वीपासून कोरोना प्रतिबंधासाठी कोवॅक्सिनचे लसीकरण सुरू करण्यात आले. ४५ वर्षे वयोगटांवरील सर्व नागरिकांना सदरचे लसीकरण करता यावे यासाठी तालुक्यातील सर्वच तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत लसीकरण मोहीम आरंभण्यात आली आहे.
आरोग्य विभागांतर्गत सदर लसीकरण सुरू असताना गावागावांत प्रचंड मोठ्या प्रमाणात कोविड चाचणीदेखील केली जात आहे. या चाचणीअंतर्गत तालुक्यातील सर्वच गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून संबंधितांवर वैद्यकीय उपचारदेखील सुरू आहे. लसीकरणाने झाल्याची बनावपूर्ण अफवा करत असल्याने नागरिकांत या लसीकरणाची भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी मृत्यूच्या भीतीने लसीकरणाकडे पाठ फिरविताना कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक शासननिर्देशांचे पालन करणेदेखील टाळल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागांतर्गत नागरिकांना नियमित लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले जात असले तरी अफवांना बळी पडलेल्या नागरिकांकडून लसीकरणाला ठाम विरोध केला जात असल्याचे देखील बोलले जात आहे.
सध्या सर्वत्रच कोरोनाचा उद्रेक होऊन बाधितांना औषधोपचारासाठी आवश्यक आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याची बोंब आहे. या परिस्थितीत नागरिकांनी या भयावह आजारापासून बचावासाठी लसीकरण करून घेणे हा एक मात्र पर्याय असल्याचे ठासून सांगितले जात आहे.
कोट बॉक्स
शासनाने कोवॅक्सिन लसीकरण मोहीम आरोग्य विभागांतर्गत सुरू केली आहे. सदर लसीकरण करून घेतल्यानंतर कोरोना संक्रमण होणार नाही हे समजणे चुकीचे आहे. सदर लस घेतल्यानंतरही कोरोना आजार होऊ शकतो व औषधोपचाराविना एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र लसीकरणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, आदी अफवा पसरविणे व लसीकरण टाळणे हे चुकीचे असल्याचे म्हणत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे.
डॉ. नलिनीकांत मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी