लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी पात्रात पाण्याचे पातळीत वाढ झाल्याने प्रकल्प स्थळात सात पंपगृहाचे पाण्याचा उपसा जलाशयात सुरु आहे. या शिवाय जलाशयातील पाण्याने शेतकऱ्यांना तारले आहे.सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी सुरुच आहे. रोवणीचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता पाटबंधारे विभाग अंतर्गत कालवे आणि नहर बंद करण्याचे सुरुवात केली आहे. ज्या शिवारात पाण्याची आवश्यकता आहे. अशाच शिवारात नहर सुरु ठेवण्यात आले आहे. रोवणीकरिता पाणी वितरण करण्यात आल्यानंतर चांदपूर जलाशय रिकामा झाला आहे. यानंतर पाऊस लांबणीवर जात असल्याचे दिसून येत असल्याने शेतकºयांचे चिंता वाढण्यास सुरुवात झाली होती.नदी पात्रातील पाण्याचे पातळीत वाढ झाल्याने सात पंपगृहाचे जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदी पात्रात माती व रेतीचे मिश्रीत गाळ असल्याने पाण्याचा प्रवाह करिता विभागाने गाळ उपसा करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. यामुळे पाण्याचा प्रवाह थांबणार नाही. या शिवाय निरंतर पंपगृह सुरु ठेवता येईल.जलाशयाच्या पाण्याने रोवणीजलाशयात नदी पात्रातून पाणी उपसा करण्याकरिता धरणाचे दरवाजे एक मिटर ने बंद करण्यात आली आहे. यामुळे आठ पंपगृहाने आठवडा भर पाण्याचा उपसा करण्यात आला असता नदी पात्रातील पाण्याची पातळीत घट झाली. पात्रात रेतीच रेती दिसून येत असल्याने पंपगृह बंद करण्याची पाळी आली. पावसाने हजेरी लावली ही हजेरी शेतकºयांना समाधानकारक दिसून आली नाही. पाऊ स नसतांना जलाशयाचे पाण्याने रोवणी केली.
बावनथडी नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM
सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी सुरुच आहे. रोवणीचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता पाटबंधारे विभाग अंतर्गत कालवे आणि नहर बंद करण्याचे सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देसोंड्याटोला सिंचन प्रकल्पात सात पंपगृह सुरु: चांदपूर जलाशयाने तारले