शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

वातावरणात वाढला गारठा; पारा नऊ अंशाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:11 PM

दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारठा वाढला असून गुरूवारला पारा नऊ अंशावर पोहचला़ नागरिक सध्या या बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत.

ठळक मुद्देवेधशाळेने वर्तविली शक्यता : ३० डिसेंबरपर्यत शीतलहरी वाहण्याचा अंदाज

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारठा वाढला असून गुरूवारला पारा नऊ अंशावर पोहचला़ नागरिक सध्या या बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. गुरुवारला सकाळी किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले़ बुधवारी पारा ८.५ अंशावर होता.दोन दिवसांपासून शीत लहरी वाहत आहेत. पहाटे कडाक्याची थंडी पडत आहे. दवबिंदूचे प्रमाणही वाढले आहे. ग्रामीण भागासह शहरातही सायंकाळपासून शेकोट्या पेटत आहेत. या थंडीचा वाहतुकीवर परिणाम दिसत आहे. सकाळची दिनचर्या उशिरा सुरू होत आहे. थंडीमुळे मानवी आरोग्यावर परिणाम झाला आहे. नागरिक आता घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर, कानटोपी शाल आदी ऊनी कपडे घालूनच घराबाहेर निघू लागाले आहेत. थंडीची चाहुल फेब्रुवारीपर्यत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.थंडीमुळे सर्दी, खोकल्याचे आजारदोन दिवसांपासून गारठा वाढल्यामुळे सर्दी-पडशाचे आजार बळावले आहेत. शहरातील रूग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी दिसू लागली आहे. सर्दी, खोकला, पडसे, तापाने फणफणाऱ्या बालकांची संख्या अधिक आहे. वृध्दांना सांधेदुखीचे आजार बळावले आहे. थंडीमुळे विषाणुजन्य आजाराची शक्यता अधिक असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.आतापर्यंतच्या कमी तापमानाच्या नोंदीमागील २५ वर्षात सर्वाधिक कमी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद १४ जानेवारी २०१२ रोजी करण्यात आली होती. २६ व २७ डिसेंबर २००५ रोजी ६ अंश सेल्सिअस, ३० डिसेंबर २००३ रोजी ९ अंश सेल्सिअस, १७, १८ व २० डिसेंबर २००४ रोजी १० अंश सेल्सिअस, सन २००६ व २००७ मध्ये थंडीचा प्रभाव समप्रमाणात जाणवला होता. २३ नोव्हेंबर २००९ रोजी ११ अंश सेल्सिअस, १८ डिसेंबर २०१० रोजी ८ अंश तर १९ डिसेंबर रोजी ९ अंश सेल्सिअस, ८ जानेवारी २०१३ रोजी ९ अंश सेल्सिअस, सन २०१४ मध्ये ७.५ अंश सेल्सिअस, २०१५ मध्ये ७ अंश सेल्सिअस तर २०१६ मध्ये जानेवारी महिन्यात ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते.