लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि दहावीच्यासुद्धा परीक्षा संपत आल्यात. या विद्यार्थ्यांना आता दहावी बारावी नंतर काय? हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. काही विद्यार्थ्यांनी या ऊन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करावे हे आधिच ठरवलेले आहे तर काहींना अजुनपर्यंत दिशाच मिळाली नाही. ही दिशा भरकटलेली मुले दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावर डोळे बंद करून चाललेली आहेत.यातील काही विद्यार्थी संगणक, चित्रकला, नृत्य, विविध खेळ यांचे ज्ञान घेणार आहेत तर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत ऊतरून आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र बरेच विद्यार्थी नेटवर्क माकेटींगच्या जाळ्यात अडकले जात आहेत.नेटवर्क माकेर्टींग कंपण्या लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या योजना विद्यार्थ्यांना सांगतात. मी कसा घडलो, याची बनवाबनवी उदाहरणे त्यांसमोर मांडतात. आकर्षक जाहीराती तसेच प्रलोभणे देऊन विद्यार्थ्यांना आकर्षीत केले जाते. त्यांची प्रलोभने पाहून विद्यार्थी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या जाळ्यात अडकली जातात. त्यानंतर त्यांकडुन अॅडमिशन फीच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल केली जाते.सध्या तालुक्यातील काही विद्यार्थी त्या फीच्या जुडवाजुडवीसाठी स्वत:च्या घरातील दाग-दागीने ठेवून झटपट पैसे कमविण्याच्या नादात घाई करत आहेत. मात्र अशा योजना फसव्या असतात. ज्या कुठलाही परतावा देत नाहीत. तरी पालकांनी आपल्या पाल्यास योग्य ती दिशा देऊन, अशा प्रलोभणांना बळी पडू देऊ नये. तसेच मुलांनी सद्धा प्रलोभणांना बळी न पडता योग्य तो निर्णय घ्यावा.
शाळकरी मुलांचा नेटवर्क मार्केटिंगकडे वाढता कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 9:33 PM