आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे एक घटक आहेत. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांची युनियन अर्थात सीआयटीयुचे वतीने घेतलेल्या निर्णयानुसार १५ जूनपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यात आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा व सामाजिक सुरक्षा पेन्शन मेडिकल योजना लागू करण्यात यावी, ४५, ४६व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन २२ हजार रुपये लागू करावे, ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तक यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, गोवर लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नाही, तरी बळजबरीने धमकावून ड्युटी लावण्यात येत आहे. त्यासाठी मानधनाची विशेष तरतूद करून प्रतिदिवस आशा, गटप्रवर्तक यांना पाचशे रुपये दैनिक भत्ता देण्यात यावा. यांसह इतर १५ मागण्यांसाठी हा संप आयोजित करण्यात आला आहे. निवेदन देताना गटप्रवर्तक वर्षा जीभकाटे, अश्विनी बांगर, आशा वर्कर सुषमा कारेमोरे, अनिता बेलपांडे, माधुरी डोंगरे यांचा समावेश आहे.
आशावर्कर व गटप्रवर्तकांचा आजपासून बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:47 AM