भंडारा तालुक्यातील परसोडी येथील ओम सत्यसाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आकस्मिक भेटीदरम्यान त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुभाषराव वाडीभस्मे होते. यावेळी डॉ. इंगोले, संस्था सहसचिव चंद्रशेखर गिरडे, कोषाध्यक्ष अरविंद आकरे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील उपस्थित होते. डॉ. इंगोले म्हणाले, शिक्षण संस्था चालविताना विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना एक सूत्रात गुंफून दर्जेदार आजचा विद्यार्थी उद्याचा भावी शिक्षक प्राध्यापक, इंजिनीअर, डॉक्टर आदी उच्चपदस्थ अधिकारी घडविण्याची जबाबदारी आहे. याला शिक्षक पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. संस्थाध्यक्ष सुभाषराव वाडीभस्मे म्हणाले, राष्ट्र ही थोर संत, महापुरुषांची भूमी आहे. विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील व गुरुजनांचे आदर करावे, शिक्षकांनी दिलेले मोलाचे गुरुमंत्र गावात किंबहुना देशात विकास कामात उपयोगात आणावे. आकस्मिक भेटीप्रसंगी विभागीय सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी विद्यार्थी कक्षात विद्यार्थ्यांची हितगुज करून आधुनिक शिक्षणप्रणालीविषयी मत जाणून घेतले. तसेच शिक्षक, प्राध्यापकाकडून अध्यापनाच्या अडचणीबाबत विचारविनिमय केला. संचालन प्रा. ज्योतीराम यांनी केले आभार प्राध्यापक दर्शना गिरडे यांनी मानले.
भारतीय शिक्षणप्रणाली जगात श्रेष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:41 AM