या विषयाची दखल घेत मंगळवारला वंचित बहुजन आघाडी भंडाराचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अतिरिक्त कार्यकारी अधिकारी एस. पानझाडे यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दिगांबर रामटेके, लाखनी तालुकाध्यक्ष दीपक जनबंधू, विजय रंगारी व रोशन खोब्रागडे उपस्थित होते.
सदर योजना जिल्हा समाजकल्याण सहआयुक्त भंडारा यांच्यामार्फत राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समिती, खंडविकास अधिकारी यांना कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यातून अंदाजे १५ हजार अर्ज भरण्यात आले आहेत. परंतु अद्याप एकाही लाभार्थ्याची यादी जाहीर करण्यात आली नाही. पंचायत समितीमार्फत अर्जदारांचे अहवाल मागवून पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात यावी, तसेच घरकुल योजनेसाठी २०१७-१८ व १९ चा मागील निधी उपलब्ध करून द्यावा, जास्त लाभार्थी संख्या लक्षात घेऊन नव्या अर्थसंकल्पात वाढीवची तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.
कोट
भटक्या विमुक्तांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे. भटक्या विमुक्तांच्या घरकुल योजनेचा शासन निर्णय जुना आहे. लाभार्थी नगण्य आहेत. किती भटक्यांना घरकुल दिले, ते सांगावे.
सुरेश खंगार, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी