माहिती नुसार, लाखांदूर तालुक्यात जवळपास १० देशी दारुची किरकोळ विक्रीचे परवानाप्राप्त दुकाने आहेत. या दुकानातून नियमित देशी दारुची किरकोळ विक्री देखील केली जात आहे. मात्र विक्री होतांना १८० एमएल क्षमतेच्या देशी दारु बॉटलची शासन निर्धारित ५२ रुपये किंमत असतांना या दुकानातून चक्क आठ रुपये अधिक वसुल करीत आहेत. ६० रुपये दराने तर ९० एमएल क्षमतेच्या देशी दारु बॉटलची २६ रुपये किमत असतांना ९ रुपये अधिक वसुल करीत ३५ रुपये मध्ये विक्री केली जात आहे. यासबंधी शासनाला संबंधित विभागाला माहिती असुनही हेतुपुरस्पर डोळेझाक केली जात असल्याचा आरोप मद्यपींकडून केला जात आहे.
सदर परवानाधारक दुकानांतर्गत चढ्या दराने देशी दारुची विक्री केली जात असल्याने अवैध दारु विक्रेत्यांच्या विक्रीतही कमालीची वाढ झाली आहे. सद्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने निवडणूक असलेल्या गावात मद्यपी मतदारांना सुगीचे दिवस आल्याचे बोलल्या जात आहे. मात्र देशी दारुच्या किमतीत परवानाधारक दुकानदारांनी कृत्रिम दरवाढ केल्याने मद्यपींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.